Railway Jobs : स्पोर्ट्स पर्सनसाठी रेल्वेत भरती; पात्रता काय? पगार किती? अर्ज प्रक्रिया जाणून घ्या

Railway Recruitment For Sport Person: खेळाची आवड असलेल्या आणि त्यात करिअर करण्याची इच्छा असणाऱ्या तरुणांसाठी आनंदाची बातमी आहे. रेल्वेत स्पोर्ट्स पर्सन पदासाठी भरती सुर आहे.
Railway Recruitment
Railway RecruitmentSaam Tv
Published On

रेल्वेमध्ये नोकरीची सुवर्णसंधी आहे. दक्षिण पूर्व मध्य रेल्वेअंतर्गत विविध पदांसाठी भरती केली जाणार आहे. दक्षिण पूर्व मध्य रेल्वेत स्पोर्ट्स पर्सन या पदांसाठी भरती केली जाणार आहे.या नोकरीसाठी विविध खेळ खेळणाऱ्या उमेदवारांची निवड केली जाणार आहे.

अॅथलेटिक्ट्स, बॉक्सिंग, हँडबॉल, खो-खो, आर्चरी, बॅडमिंटन बास्केटबॉल, क्रिकेट, कबड्डी आणि वेटलिफ्टिंग या स्पोर्ट्समधील उमेदवारांसाठी ही नोकरीची संधी असते. महिला व पुरुष उमेदवारांसाठी ही चांगली संधी आहे. (Railway Job For Sport Person)

Railway Recruitment
RRB NTPC Recruitment 2024: बारावी पास उमेदवारांना नोकरीची संधी; रेल्वेमध्ये ३४४५ पदांसाठी भरती, अर्ज नोंदणी सुरू

रेल्वेमध्ये नोकरी करण्याची अनेकांची इच्छा असते. जर तुम्हाला रेल्वेतील काम शिकायचे असेल तेथील कामाचा अनुभव घ्यायचा असेल तर ही चांगली संधी आहे.

रेल्वेत एकूण ४६ जागांसाठी ही भरती करण्यात येणार आहे. या नोकरीसाठी ऑनलाइन पद्धतीवे अर्ज करायचा आहे. या नोकरीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख २० ऑक्टोबर २०२४ आहे. या जाहिरात अधिकृत वेबसाइटवर देण्यात आली आहे.

रेल्वेत स्पोर्ट्स पर्सन पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेजदवाराने कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवीधर असणे गरजेचे आहे.तसेच संबंधित स्पोर्ट खेळायचा अनुभव असायला हवा. त्या स्पोर्ट्समध्ये उमेदवाराने प्रमाणपत्र मिळवले असावे. (Railway Recruitment)

Railway Recruitment
SBI Jobs: स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये ऑफिसर होण्याची संधी; मिळणार ९३००० रुपये पगार; पात्रता काय?

या नोकरीसाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे. या नोकरीसाठी तुम्हाला ५०० रुपये अर्ज फी भरायची आहे. या नोकरीसाठी उमेदवारांना २०,२०० रुपये मानधन मिळणार आहे. हा पगार ७व्या वेतन आयोगानुसार असेल. या नोकरीसाठी अर्जप्रक्रिया २१ सप्टेंबर २०२४ पासून सुरु झाली आहे.

या नोकरीबाबत सर्व माहिती secr.indianrailways.gov.in या वेबसाइटवर देण्यात आली आहे. या नोकरीसाठी तुम्हाला अर्ज करताना तुम्हाला आवश्यक कागदपत्रे जोडावी लागणार आहे.

Railway Recruitment
Infosys -TCS Jobs : सुवर्णसंधी! इन्फोसीस टीसीएससह या आयटी कंपनीत बंपर भरती, ९ लाखांपर्यंत पगार; आताच करा अर्ज

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com