BPCL Recruitment Saam Tv
naukri-job-news

BPCL Recruitment: पदवीधर आहात? भारत पेट्रोलियममध्ये आहे सरकारी नोकरीची संधी; अर्ज कसा करावा?

Bharat Petroleum Recruitment : भारत पेट्रोलियममध्ये नोकरी करण्याची सुवर्णसंधी तुमच्याकडे आहे. ज्युनिअर एक्झिक्युटिव्ह आणि सेक्रेटरी पदासाठी ही भरती जाहीर करण्यात आली आहे.

Siddhi Hande

शिक्षण पूर्ण झालंय अन् नोकरी शोधताय तर ही बातमी खास तुमच्यासाठी. भारत पेट्रोलियममध्ये सध्या भरती सुरु आहे. भारत पेट्रोलियममध्ये ज्युनिअर एक्झिक्युटिव्ह आणि सचिव पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. या नोकरीसाठी अर्जप्रक्रिया सुरु झाली आहे. या नोकरीबाबत अधिसूचना जाहीर करण्यात आली आहे.

भारत पेट्रोलियममधील या नोकरीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख २२ फेब्रुवारी २०२५ आहे. इच्छुक उमेदवारांनी https://www.bharatpetroleum.in या वेबसाइटवर जाऊन अर्ज करायचा आहे.

ज्युनिअर एक्झिक्युटिव्ह (क्वालिटी) या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांना रासायनिक सायन्समध्ये BSc डिग्री प्राप्त केली असावी. उमेदवारांना ऑर्गॅनिक, फिजिकल, इनऑर्गॅनिक आणि अॅनालिटिकल केमिक्सट्रीमध्ये स्पेशलायझेशन केलेले असावी. याचसोबत रासायनिक अभियांत्रिकीमध्ये डिप्लोमा केलेला असावा. उमेदवारांकडे पेट्रोलियम/ऑइल अँड गॅस/ पेट्रो-केमिकल इंडस्ट्रीमध्ये कमीत कमी ५ वर्षांचा अनुभव असावा.

सेक्रेटरी पदासाठी उमेदवाराने मान्यताप्राप्त विद्यापीठातून बॅचलर पदवी प्राप्त केलेली असावी.याचसोबक प्रशासनिक सेक्रेटरी, पीए/ एक्झिक्युटिव्ह / ऑफिस मॅनेजमेंट पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांकडे ६ महिन्याचा डिप्लोमा किंवा सर्टिफिकेट कोर्स केलेला असावा.

या नोकरीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांची कमाल वयोमर्यादा २९ वर्षे असावी. या नोकरीसाठी अर्ज करताना सामान्य प्रवर्गातील उमेदवारांना ११८० रुपये शुल्क भरावे लागणार आहे.

या नोकरीसाठी उमेदवारांची निवड सर्वप्रथम शैक्षणिक योग्यतेद्वारे केली जाणार आहे. त्यानंतर कॉम्प्युटर टेस्ट, ग्रुप डिस्कशन आणि मुलाखतीद्वारे केली जाणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mirchi Bhaji Recipe: हॉटेलसारखी खुसखुशीत मिरची भजी कशी बनवायची?

Maharashtra Live News Update: मुंबईच्या पश्चिम द्रुतगती महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी

New Year 2026 Trip : पांढरी वाळू, निळाशार समुद्र, सूर्यास्ताचा नजारा; मुंबईजवळ कॅम्पिंगचे सुंदर लोकेशन

Horoscope: ओळखीचा होणार फायदा, व्यवसायात धनलाभाचा योग; जाणून घ्या कोणत्या राशींसाठी खास आहे आजचा दिवस

Hair Oil Benefits: हिवाळ्यात केस गळतीला करा बाय बाय, घरीच बनवा कढीपत्ता, कांदा आणि कोरफडीचा तेल

SCROLL FOR NEXT