IRCTC Recruitment: कोणत्याही परीक्षेशिवाय मिळणार सरकारी नोकरी; IRCTC मध्ये भरती; अर्ज कसा करावा?

IRCTC Recruitment 2025: आयआरसीटीसीमध्ये नोकरी करण्याची सुवर्णसंधी तुमच्याकडे आहे. हॉस्पिटॅलिटी मॅनेजरमध्ये नोकरी करण्याची संधी तुमच्याकडे आहे.
IRCTC Recruitment
IRCTC RecruitmentSaam Tv
Published On

नोकरीच्या शोधात असणाऱ्या तरुणांसाठी महत्त्वाची बातमी आहे. आयआरसीटीसी म्हणजे इंडियन रेल्वे कॅटरिंग अँड टूरिज्म कॉर्पोरेशनमध्ये नोकरी करण्याची सुवर्णसंधी तुमच्याकडे आहे.आयआरसीटीसी हे रेल्वेतील सर्व जेवणाची- नाश्त्याची, खाद्य पदार्थांची सोय करते.

IRCTC Recruitment
Central Bank Jobs: खुशखबर! सेंट्रल बँकेत नोकरीची संधी; २६६ रिक्त जागा; पात्रता अन् अर्जप्रक्रिया जाणून घ्या

IRCTC मध्ये हॉस्पिटॅलिटी मॅनेजर पदासाठी भरती जाहीर केली आहे. या नोकरीबाबत सविस्तर माहिती अधिकृत वेबसाइटवर देण्यात आली आहे. एकूण ६ रिक्त पदांवर ही भरती केली जाणार आहे. या नोकरीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ४ मार्च २०२५ आहे.

हॉस्पिटॅलिटी मॅनेजर पदासाठी ६ जागा रिक्त आहे. त्यात सामान्य प्रवर्गासाठी दोन जागा रिक्त आहेत. ओबीसी प्रवर्गासाठी ३ जागा रिक्त आहे. तर एससी प्रवर्गातील उमेदवारांसाठी १ जागा रिक्त आहे.

आयआरसीटीसीच्या या नोकरीच्या अर्ज करणाऱ्या उमेदवारांची वयोमर्यादा २८ वर्ष असणे गरजेचे आहे. याचसोबत राखीव प्रवर्गातील उमेदवारांना वयोमर्यादेत सूट देण्यात येणार आहे.

आयआरसीटीसीमधील या नोकरीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराने हॉस्पिटॅलिटीमध्ये B.SC केलेले असावे. तसेच कलिनरी आर्ट्समध्ये एमबीए किंवा बीबीए केलेले उमेदवार अर्ज करु शकतात.

IRCTC Recruitment
Government Job: १२वी पास तरुणांसाठी सरकारी नोकरीची संधी, Aadhaar मध्ये नोकरीची संधी, अर्ज कसा करावा?

या नोकरीसाठी निवड झालेल्या उमेदवारांना ३०,००० रुपये पगार मिळणार आहे. याचसोबत महागाई भत्ता आणि अनेक भत्तेदेखील दिले जातील.या नोकरीसाठी उमेदवारांची निवड वॉक इन इंटरव्ह्यूद्वारे केली जाणार आहे. इंटरव्ह्यूसाठी जाताना तुम्हाला कागदपत्रे सोबत घेऊन जायचे आहे. या नोकरीच्या मुलाखतीसाठी तुम्हाला IRCTC, दक्षिण मध्ये क्षेत्रीय कार्यालय, ऑक्सफोर्ड प्लाझा, सरोजनी देव रोड, सिकंदराबाद येथे उपस्थित राहायचे आहे.

IRCTC Recruitment
Income Tax Job: आयकर विभागात नोकरीची संधी; पगार २ लाख रुपये; पात्रता काय? जाणून घ्या

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com