Government Job: १२वी पास तरुणांसाठी सरकारी नोकरीची संधी, Aadhaar मध्ये नोकरीची संधी, अर्ज कसा करावा?

Aadhaar Recruitment 2025: सरकारी नोकरी करण्याची सुवर्णसंधी तरुणांकडे आहे. देशातील अनेक ठिकाणी आधार कार्ड सेंटरमध्ये सुपरवायजर पदासाठी भरती सुरु आहे.
UIDAI Job
UIDAI JobSaam Tv
Published On

सरकारी नोकरीच्या शोधात असणाऱ्या तरुणांसाठी आनंदाची बातमी आहे. आधार सेवा केंद्रमध्ये आधार ऑपरेटर आणि सुपरवाइजर पदासाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. या नोकरीसाठी इच्छुक उमेदवारांनी अर्ज करावेत. या नोकरीसाठी कॉमन सर्विस सेंटरद्वारा फॉर्म भरावे लागणार आहे. ही नोकरी २३ राज्यांसाठी होणार आहे. (Government Job)

UIDAI Job
Job News: अ‍ॅग्रीकल्चर विमा कंपनीमध्ये व्यवस्थापकीय पदांची भरती, जाणून घ्या पात्रता आणि अर्जाची तारीख

या नोकरीसाठी अर्जप्रक्रिया सुरु झाली आहे. या नोकरीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख २८ फेब्रुवारी २०२५ आहे. कॉमन सर्विस सेंटर हे भारत सरकारच्या डिजिटल इंडियाअंतर्गत काम करते. यासाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. या नोकरीसाठी गुजरात, हरियाणा, जम्मू काश्मीर,जम्मू काश्मीर, झारखंड, कर्नाटक, केरळ, मध्य प्रदेश, महाराष्ट्र या ठिकाणी अर्जप्रक्रिया सुरु आले. या नोकरीसाठी जिल्ह्यानुसार वॅकेंसी जाहीर करण्यात आली आहे. (Aadhaar Recruitment)

UIDAI Job
Central Bank Jobs: सेंट्रल बँकेत अधिकारी होण्याची संधी; पगार ८५९२०; पात्रता अन् अर्जप्रक्रिया जाणून घ्या

आधार सुपरवाइजर आणि ऑपरेटर पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराने मान्यताप्राप्त विद्यापीठातून १०वी, १२वी पास करणे गरजेचे आहे. याचसोबत दोन वर्षीय १०आयटीआय/ ३ वर्षीय पॉलिटेक्निक डिप्लोमा पदवी प्राप्त केलेली असावी. या नोकरीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे UIDAI द्वारा प्रमाणित आधार सर्व्हिसमध्ये आधार ऑपरेटर / सुरवाइजर पदाचे सर्टिफिकेट असणे गरजेचे आहे.

या नोकरीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराला कॉमप्युटरचे बेसिक ज्ञान असणे गरजेचे आहे. या नोकरीसाठी अधिकृत नोटिफिकेशन जाहीर करण्यात आले आहे.या नोकरीसाठी उमेदवारांची निवड एक वर्षाच्या कॉन्ट्रॅक्ट बेसवर केली जाणार आहे. या नोकरीसाठी उमेदवारांना राज्यानुसार निर्धारित पगार दिला जाणार आहे.

UIDAI Job
Government Job: वनविभागात सरकारी नोकरीची सुवर्णसंधी; पगार ५०,००० रुपये; पात्रता अन् अर्जप्रक्रिया जाणून घ्या

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com