Government Job: डिप्लोमा झालाय? केंद्र सरकारच्या या कंपनीत मिळेल नोकरी; पगार किती? जाणून घ्या

Bharat Electronics Limited Recruitment 2024: सरकारी नोकरी करण्याची सुवर्णसंधी तुमच्याकडे आहे. भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेडमध्ये विविध पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे.
Government Job
Government JobSaam Tv
Published On

तरुणांसाठी सरकारी नोकरीची सुवर्णसंधी आहे. बीईएल म्हणजेच भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेडमध्ये नोकरीची सुवर्णसंधी आहे. भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेडमध्ये ९० रिक्त पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. या नोकरीसाठी इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात आले आहेत.

भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेडमध्ये डिप्लोमा अप्रेंटिस पदासाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. ९० रिक्त जागांवर ही भरती करण्यात आली आहे. डिप्लोमा अप्रेंटिस पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराची वयोमर्यादा २५ वर्ष निश्चित करण्यात आली आहे. (Government Job)

Government Job
BMC Job: बृहन्मुंबई महानगरपालिकेत नोकरीची संधी; मिळणार १४२००० पगार; असा करा अर्ज

भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेडमध्ये डिप्लोमा अप्रेंटिस पदासाठी १२,५०० रुपये पगार देण्यात येणार आहे. या नोकरीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख १२,५०० रुपये आहे.

भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेडमधील या नोकरीसाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे. तुम्ही https://bel-india.in/ या वेबसाइटवर जाऊन अर्ज करु शकतात.

या नोकरीसाठी अर्ज करणारा व्यक्ती भारतीय नागरिक असावा. या नोकरीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराने AICTE किंवा GOI द्वारे मान्यताप्राप्त शाखेतून डिप्लोमा केलेला असावा.या नोकरीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय जास्तीत जास्त २५ वर्ष असावे. तसेच राखीव प्रवर्गातील उमेदवारांसाठी वयोमर्यादेत सूट देण्यात आली आहे.बीईएल गाझियाबादद्वारे ही भरती करण्यात येणार आहे. या नोकरीसाठी उमेदवारांची निवड लेखी परिक्षेद्वारे केली जाणार आहे. (Bharat Electronics Limited Recruitment)

Government Job
Airport Job: एअरपोर्टवर नोकरी करण्याची संधी; पात्रता पदवीधर; अर्ज कसा करायचा? जाणून घ्या

या नोकरीसाठी अर्ज करताना सर्वप्रथम तुम्हाला https://nats.education.gov.in/ वर जाऊन विद्यार्थी नोंदणीवर क्लिक करा. त्यानंतर फॉर्म भरा. तुम्हाला युनिट एनरोलमेंट नंबर दिला जाईल. यानंतर तुम्हाला अर्ज करायचा आहे.

Government Job
Delhi Metro Job: दिल्ली मेट्रोत नोकरीची संधी; महिना ७२,००० पगार; अर्ज कसा करावा? जाणून घ्या

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com