दिल्ली मेट्रोत नोकरीची सुवर्णसंधी आहे. दिल्ली मेट्रो रेल कॉर्पोरेशनने भरती जाहीर केली आहे. डीएमआरसीने मुंबई प्रोजेक्टसाठी ही भरती जाहीर केली आहे. मुंबई प्रोजेक्टसाठी सुपरवाइजर, ज्युनिअर इंजिनियर, असिस्टंट सेक्शन इंजिनियर, सेक्शन इंजिनियर, सीनियर सेक्शन इंजिनियर या पदांसाठी ही भरती जाहीर करण्यात आली आहे.
दिल्ली मेट्रोतील या नोकरीसाठी एकूण ९ रिक्त जागांवर भरती जाहीर करण्यात आली आहे. या नोकरीसाठी तुम्ही दिल्ली मेट्रोच्या अधिकृत वेबसाइटवर माहिती देण्यात आली आहे. या नोकरीसाठी https://delhimetrorail.com वर जाऊन अर्ज करु शकतात. या नोकरीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ८ नोव्हेंबर २०२४ आहे. (Delhi Metro Job)
या नोकरीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराना इलेक्ट्रिकल इंजिनियरिंग, इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्युनिकेशन इंजिनियरिंग, आयटी किंवा कॉम्प्युटर सायन्स, इन्स्ट्रुमेंटेशन आणि कंट्रोल इंजिनियरिंग पदवी प्राप्त उमेदवार या नोकरीसाठी अर्ज करु शकतात. या नोकरीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय ५५ ते ६२ वर्ष असावे.
या नोकरीसाठी उमेदवारांना कोणतीही लेखी परीक्षा द्यावी लागणार नाही. उमेदवारांची निवड मुलाखतीद्वारे केली जाणार आहे. मुलाखतीत निवड झाल्यानंतर मेडिकल फिटनेस टेस्ट केली जाणार. त्यानंतर उमेदवारांची निवड केली जाणार आहे. (Delhi Metro Recruitment 2024)
या नोकरीसाठी निवड झालेल्या उमेदवारांना ५०,००० ते ७२,६०० रुपये मासिक वेतन मिळणार आहे. या नोकरीसाठी तुम्ही डीएमआरसीच्या अधिकृत वेबसाइटवरुन फॉर्म डाउनलोड करा. हा फॉर्म भरुन career@dmrc.orgया मेल आयडीवर किंवा कार्यकारी निर्देशक (एचआर), दिल्ली मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड, मेट्रो भवन, फायर ब्रिगेड लेन, बाराखंबा रोड, नवी दिल्ली येथे अर्ज करायचा आहे. इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर अर्ज करावेत. (Delhi Metro Job Recruitment)
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.