ESIC Recruitment
ESIC RecruitmentSaam Tv

Government Job: सरकारी नोकरी अन् २ लाख रुपये पगार; कर्मचारी राज्य विमा महामंडळात सुरु आहे भरती; जाणून घ्या सविस्तर

ESIC Recruitment 2024: सरकारी नोकरीच्या शोधात असणाऱ्या तरुणांसाठी महत्त्वाची बातमी आहे. कर्मचारी राज्य विमा महांमंडळात नोकरी करण्याची संधी तुमच्याकडे आहे.
Published on

कर्मचारी राज्य विमा महामंडळात सरकारी नोकरी करण्याची सुवर्णसंधी तुमच्याकडे आहे. जर तुम्ही सरकारी नोकरीच्या शोधात असाल तर तुम्ही या नोकरीसाठी अर्ज करावा. कर्मचारी राज्य विमा महामंडळात सीनियर रेजिडेंट, स्पेशलिस्ट, सुपर स्पेशलिस्ट या पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. या नोकरीसाठी अर्जप्रक्रिया सुरु झाली आहे.

ESIC भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख २५ ऑक्टोबर २०२४ आहे. या नोकरीसाठी इच्छुक उमेदवारांनी मुदतीपूर्वी अर्ज करावेत. (Government Job)

ESIC Recruitment
Bank Jobs: परीक्षा नाही थेट नोकरी, बँक ऑफ बडोदामध्ये जॉबची संधी, जाणून घ्या पगार अन् अर्ज प्रक्रिया

कर्मचारी राज्य विमा महामंडळात सीनियर रेजिडेंट पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराची कमाल वयोमर्यादा ४५ वर्ष आहे. तसेच स्पेशलिस्ट आणि सुपर स्पेशलिस्ट पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय ६९ वय असावे.

या नोकरीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराने मान्यताप्राप्त विद्यापीठातून पोस्ट ग्रॅज्युएशन/डीएनबी/ डिप्लोमा केलेला असावा.सुपर स्पेशलिस्ट पदासाठी नेफ्रोलॉजी आणि न्युरोलॉजी पदवी प्राप्त उमेदवार अर्ज करु शकतात. स्पेशलिस्ट पदासाठी उमेदवारांना १,२१,००० रुपये पगार मिळणार आहे तर सुपर स्पेशलिस्ट पदासाठी २ लाख रुपये पगार मिळणार आहे. (ESIC Job Recruitment)

ESIC Recruitment
Railway Jobs: रेल्वेत नोकरी अन् २५०००० रुपये पगार; 'या' पदासाठी सुरु आहे भरती; अशा पद्धतीने करा अर्ज

ईएसआयसी भरतीमधील नोकरीसाठी लॉक इन इंटरव्ह्यूद्वारे भरती केली जाणार आहे. या नोकरीसाठी इंटरव्ह्यूला जाताना आवश्यक कागदपत्रे घेऊन जा. या नोकरीसाठी वॉक इन इंटरव्ह्यू २९ ऑक्टोबर २०२४ रोजी होणार आहे. या इंटरव्ह्यूसाठी तुम्हाला २०७, दुसरा माळा, ईएसआयसी मॉडेल हॉस्पिटल, जयपुरस राजस्थान येथे उपस्थित राहायचे आहे. (ESIC Recruitment 2024)

ESIC Recruitment
Delhi Metro Job: दिल्ली मेट्रोत नोकरीची सुवर्णसंधी; महिना ११२००० पगार; अर्ज कसा करावा? जाणून घ्या

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News Saam TV
saamtv.esakal.com