BEL Recruitment Saam Tv
naukri-job-news

BEL Recruitment: सरकारी कंपनीत नोकरीची संधी; ९०,००० रुपये पगार; अर्ज कसा करावा?

BEL Recruitment 2025: भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेडमध्ये नोकरी करण्याची सुवर्णसंधी तुमच्याकडे आहे. सध्या भारत इलेक्ट्रॉनिक्समध्ये इंजिनियरिंग असिस्टंट ट्रेनी आणि टेक्निशियन सी पदासाठी भरती जाहीर करण्यात आली आहे.

Siddhi Hande

सरकारी नोकरीच्या शोधात असाल तर ही बातमी खास तुमच्यासाठी. भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेडमध्ये सध्या भरती जाहीर करण्यात आली आहे. इंजिनियरिंग असिस्टंट ट्रेनी आणि टेक्निशियन सी पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. एकूण १६२ पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे.

भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेडमधील या नोकरीसाठी तुम्हाला ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचे आहे. बीईएलमध्ये इंजिनियरिंग असिस्टंट ट्रेनी पदासाठी ८० जागा रिक्त आहेत. टेक्निशियन पदासाठी ८२ जागा रिक्त आहेत.या नोकरीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ४ नोव्हेंबर २०२५ आहे.

पात्रता (Eligibility)

इंजिनियरिंग असिस्टंट ट्रेनी पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराने मान्यताप्राप्त विद्यापीठातून इंजिनियरिंगमध्ये तीन वर्षांचा डिप्लोमा पास केलेला असावा. टेक्निशियन पदासाठी उमेदवारांनी एसएसएलस सर्टिफिकेट किंवा अप्रेंटिस सर्टिफिकेट कोर्स केलेला असावा.

इंजिनियरिंग असिस्टंट ट्रेनी पासाठी २४,५०० ते ९०,००० रुपये पगार मिळणार आहे. टेक्निशियन पदासाठी २१,५०० ते ८२,००० रुपये पगार मिळणार आहे. या नोकरीसाठी १८ ते २८ वयोगटातील उमेदवार अर्ज करु शकतात.राखीव प्रवर्गातील उमेदवारांना वयोमर्यादेत सूट देण्यात आली आहे. या नोकरीसाठी अर्ज करताना तुम्हाला ५९० रुपये शुल्क भरायचे आहे. तर राखीव प्रवर्गातील उमेदवारांना कोणतेही शुल्क भरायचे नाही.

तुम्ही फ्रेशर्स असाल तर तुमच्यासाठी नोकरीची ही उत्तम संधी आहे. चांगल्या कंपनीत तुम्हाला नोकरी करायला मिळणार आहे. याचसोबत तुम्हाला चांगला पगारदेखील मिळणार आहे. या कंपनीत तुम्हाला अनेक गोष्टी शिकायला मिळतील. या गोष्टींचा तुम्हाला भविष्यात खूप फायदा होईल. इतर ठिकाणी तुम्हाला कामाच्या अनेक संधी निर्माण होतील.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर विद्यार्थ्यांना घेऊन जाणाऱ्या आयशर टेम्पोचा भीषण अपघात

Breaking : धक्कादायक! मुंबई, नागपूरसह ४ कोर्टाला बॉम्बने उडवण्याची धमकी, राज्यात खळबळ

Five Hundred Rupees Note: ५०० रुपयांच्या नोटेवर किती भाषा असतात?

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींनो eKYC झाली का? फक्त १२ दिवसांचा वेळ, वाचा स्टेप बाय स्टेप प्रोसेस

Accidents : पुण्यात भीषण अपघातात तिघांचा जागीच मृत्यू, जालना अन् बुलडाण्यात भयंकर दुर्घटना, राज्यात ७ जण ठार

SCROLL FOR NEXT