
सरकारी नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. एनटीपीसीमध्ये नोकरी करण्याची सुवर्णसंधी आहे. एनटीपीसी मायनिंग लिमिटेडने नवी भरती जाहीर केली आहे. यामध्ये तरुणांना नोकरीची संधी आहे. एनटीपीसी मायनिंग लिमिटेडमध्ये एक्झिक्युटिव्ह फायनान्स, एक्झिक्युटिव्ह एनवायरमेंट मॅनेजमेंट आणि असिस्टंट माइन सर्वेयर पदासाठी भरती जाहीर करण्यात आली आहे.
एनटीपीसीने आपल्या अधिकृत वेबसाइटवर नोकरीबाबत अधिसूचना जाहीर केली आहे. तुम्ही nml.co.in वर जाऊन अर्ज करु शकतात. अधिसूचनेनुसार, या नोकरीसाठी अर्जप्रक्रिया २७ ऑक्टोबरपासून सुरु होणार आहे. या नोकरीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख १५ नोव्हेंबर २०२५ आहे. तुम्हाला मूदतीपूर्वी अर्ज करायचे आहे.
एनएमसी ही एनटीपीसी लिमिटेडची सहायक कंपनी आहे.या कंपनीत नोकरी करण्याची संधी आहे. २१ पदांसाठी ही भरती जाहीर करण्यात आली आहे. त्यामुळे तुम्हाला अर्ज करायचे आहे. अद्याप पात्रतेबाबत कोणतीही माहिती समोर आलेली नाही. मात्र, डिग्री, सीएम किंवा पदवीधर उमेदवार अर्ज करु शकतात.
या भरतीबाबतची सर्व माहिती तुम्ही अधिकृत वेबसाइटवर जाऊन चेक करा. एक्झिक्युटिव्ह, असिस्टंट माइन सर्वेयर पदासाठी निवड झाल्यावर तुम्हाला झारखंड, छत्तीसगड आणि ओडिशा येथील मायनिंग प्रोजेक्ट कार्यालयात नियुक्ती केली जाईल.३ वर्षांसाठी ही भरती केली जाणार आहे त्यानंतर दोन वर्षांसाठी हा कालावधी वाढवला जाईल.
अर्ज कसा करावा?
सर्वात आधी तुम्हाला एनएमएलच्या nml.co.in अधिकृत वेबसाइटवर जायचे आहे.
यानंतर फॉर्मची लिंक ओपन करा.
तिथे जाऊन तुम्हाला अप्लाय ऑनलाइनवर क्लिक करा.
यानंतर तुमची माहिती, शैक्षणिक पात्रता याबाबत सर्व माहिती लिहा.
यानंतर तुमचा फोटो आणि सही अपलोड करा.
फॉर्म सबमिट करण्यापूर्वी प्रिंट आउट काढून ठेवा.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.