Prem Birhade News : पुण्याच्या कॉलेजचा 'मॉडर्न' जातीयवाद? तरुणाला गमवावी लागली लंडनमधील नोकरी, VIDEO

Prem Birhade News update : पुण्यातील कॉलेजच्या मॉडर्न जातीयवादानं एका विद्यार्थ्याच्या नोकरीचा बळी घेतलाय.. तरुणाला थेट लंडनमधील नोकरी गमवावी लागलीय.. मात्र हा तरुण कोण आहे? आणि कॉलेजने त्याच्या नोकरीचा कसा बळी घेतलाय? पाहूयात....
Prem Birhade
Prem Birhade News updateSaam tv
Published On

पुण्यातील मॉडर्न कॉलेजच्या जातीयवादामुळे लंडनमधील नोकरी गेल्याचा खळबळजनक आरोप करत प्रेम बिऱ्हाडे या तरुणाने केलेत. शैक्षणिक कागदपत्रांची पडताळणी करुन प्रमाणपत्रं द्यायला कॉलेजने नकार दिल्यानेच लंडनमधील कंपनीतील नोकरी गमावण्याची वेळ आपल्यावर आल्याचा आरोप प्रेम बिऱ्हाडेने सोशल मीडियावर व्हिडीओ पोस्ट करुन केलाय.

प्रेम बिऱ्हाडेच्या आरोपानंतर त्याचे तीव्र राजकीय पडसाद उमटलेत. थेट प्राचार्य आणि विभागप्रमुखांवर कारवाई करावी या मागणीने जोर धरलाय...तर कॉलेजने मात्र आरोप फेटाळून लावत प्रेम बिऱ्हाडेवरच कारवाई करण्याचा इशारा दिलाय..

कॉलेजने दिलेल्या स्पष्टीकरणानंतर आता प्रेम बिऱ्हाडेने नवा व्हिडीओ पोस्ट करत कॉलेजसोबतच्या पत्रव्यवहाराचे आणि पाठपुराव्याचे पुरावेच सादर केलेत...

Prem Birhade
Maharashtra Politics : नाशिकमध्ये वातावरण फिरलं; भाजपला मोठा धक्का, बडा नेता ठाकरे गटात जाणार

हा प्रेम बिऱ्हाडे नेमका कोण आहे? पाहूयात..

प्रेम बिऱ्हाडे हा नंदुरबार जिल्ह्यातील तरुण आहे.. त्याने 2020 ते 2024 दरम्यान मॉडर्न कॉलेजमध्ये बीबीएची पदवी घेतली. त्यानंतर त्याने ब्रिटनमधील युनिव्हर्सिटी ऑफ सक्सेसमध्ये पदव्युत्तर शिक्षण घेतलं.

खरं तर ज्या पुण्यातून महात्मा फुले, महर्षी कर्वेंनी जातीयवाद संपवण्यासाठी शिक्षणाच्या मार्गाने प्रयत्न केले... मात्र आता मॉडर्न कॉलेजसारख्या प्रतिष्ठित कॉलेजमध्ये असा जातीयवादी प्रकार घडत असेल तर ही चिंतेची बाब आहे. त्यामुळे या प्रकरणाच्या मुळाशी जाऊन दूध का दूध आणि पानी का पानी करणं गरजेचं आहे..

Prem Birhade
Pune Crime : आधी कोयता दाखवून तरुणांनी नंगानाच केला, पोलिसांनी तासाभरात उतरवला सर्वांचा माज; गावभर काढली धिंड

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com