Pune Crime news
Pune Crime Saam tv

Pune Crime : आधी कोयता दाखवून तरुणांनी नंगानाच केला, पोलिसांनी तासाभरात उतरवला सर्वांचा माज; गावभर काढली धिंड

Pune Crime news : पुण्यातील धायरी गावात काही तरुणांनी कोयता दाखवून नंगानाच केला. त्यानंतर पोलिसांनी तासाभरात सर्वांचा माज उतरवला.
Published on
Summary

धायरी गावात तीन तरुणांनी कारच्या बोनेटवर चढून कोयता दाखवून माजवली दहशत

नागरिकांनी नांदेड सिटी पोलिस ठाण्यात तक्रार

पोलिसांनी तात्काळ कारवाई करत केली तीन आरोपींना अटक

पोलिसांनी आरोपींची गावभर धिंड काढली

पुणे : पुण्यातील धायरी गावात गाडीच्या बोनेटवर कोयता दाखवून दहशत माजवणाऱ्यांची पोलिसांनी वरात काढली. जिथे कोयता घेऊन दहशत केली, तिथे जाऊन पोलिसांनी आरोपींची वरात काढली. पुण्यातील धायरी गावात हत्यार घेऊन दहशत माजवणाऱ्या तरुणांच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या.

पुण्यातील धायरी गावात तरुणांनी दहशत माजवली होती. प्रथमेश देविदास बनसोडे (वय २३), आभिद महेश गुरव(वय २५), आदेश बाळू वाळके (वय २२) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.

Pune Crime news
IND vs AUS : वनडे सीरीजआधीच ऑस्ट्रेलियाला मोठा धक्का; स्टार खेळाडू संघाच्या बाहेर

मिळालेल्या माहितीनुसार, धायरी गावातील काही नागरिकांनी नांदेड सिटी पोलीस ठाण्यातील कर्मचाऱ्यांना तक्रार केली की, पवळी चौकात एक तरुण कारच्या बोनेटवर चढून हातात कोयता घेऊन येणाऱ्या जाणाऱ्या लोकांना हत्यारांचा धाक दाखवत आहे. तसेच त्याचे दोन साथीदार शिवीगाळ करून दहशत माजवत आहेत.

Pune Crime news
Bihar Politics : महाठग, NDAची हवा, ५ किंगमेकर नेते; महाराष्ट्राचे CM फडणवीस बिहारमध्ये प्रचाराला, सांगितलं बेरजेचं राजकारण

नागरिकांच्या तक्रारीनंतर नांदेड पोलिस ठाण्यातील तीन जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलिसांनी तपास केल्यावर या तरुणांना ताब्यात घेतले. त्यानंतर ज्या ठिकाणी या तरुणांनी दहशत माजवली, तिथे जाऊन त्यांची धिंड काढली.

Q

पोलिसांनी आरोपींवर काय कारवाई केली?

A

पोलिसांनी आरोपींवर गुन्हा नोंदवल्यानंतर अटक करत गावभर धिंड काढली.

Q

आरोपींची नावे काय?

A

प्रथमेश बनसोडे, आभिद गुरव, आदेश वाळके अशी आरोपींची नावे आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com