IND vs AUS : वनडे सीरीजआधीच ऑस्ट्रेलियाला मोठा धक्का; स्टार खेळाडू संघाच्या बाहेर

ind vs aus series 2025 : वनडे सीरीजआधीच टीम इंडियाला मोठा दिलासा मिळालाय. ऑस्ट्रेलियाचा स्टार खेळाडू संघाच्या बाहेर गेलाय.
IND vs AUS
australiasaam tv
Published On
Summary

भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया वनडे मालिका १९ ऑक्टोबरपासून सुरू होणार

मालिकेआधीच ऑस्ट्रेलियाला मोठा झटका बसला

स्टार खेळाडू कॅमरुन ग्रीन दुखापतीमुळे संघाच्या बाहेर

ग्रीनच्या जागी मार्नस लाबुशेनला संघात स्थान देण्यात आलंय

भारत आणि ऑस्ट्रेलियामध्ये तीन सामन्यांची वनडे सीरीज १९ ऑक्टोबरपासून सुरु होणार आहे. या वनडे सीरीजआधीच ऑस्ट्रेलियाचं टेन्शन वाढलं आहे. स्टार खेळाडू पॅट कमिन्स हा संघाच्या बाहेर आहे. तर मिचेल मार्श संघाचं नेतृत्व करत आहे. तर सीरीजआधीच आता कॅमरुन ग्रीन संघाच्या बाहेर गेली आहे. ग्रीनच्या ऐवजी मार्नस लाबुशेनची संघात एन्ट्री झाली आहे.

टीम इंडियाच्या विरोधात वनडे सीरीजच्या दोन दिवस आधीच ऑस्ट्रेलियाला मोठा धक्का बसला आहे. मागील एका वर्षापासून कॅमरुन ग्रीन चांगली कामगिरी करत आहे. अनेक सामन्यात त्याने गेमचेंजर कामगिरी केली आहे. मात्र, इंडियाविरोधातील सीरीजआधीच कॅमरून संघाबाहेर गेला आहे. कॅमरून दुखापतग्रस्त झाल्याने ऑस्ट्रेलिया संघाचं टेन्शन वाढलं आहे.

IND vs AUS
Railway Station Update : मोठी बातमी! महाराष्ट्रातील आणखी एका रेल्वे स्टेशनचं नामांतर; नावात काय केला बदल? जाणून घ्या

मार्नस लाबुशेनला दक्षिण आफ्रिकेच्या विरोधात वनडे सीरीज झाल्यानंतर संघात स्थान दिलं नव्हतं. मार्नसने देशांतर्गत क्रिकेटमध्ये चांगली कामगिरी केली. त्यानंतर आता त्याची संघात पुन्हा एन्ट्री झाली आहे. आता संघात स्थान टिकवून ठेवण्याची चांगली संधी आहे.

IND vs AUS
Mumbai Electric Boat : मोठी बातमी! मुंबईत लवकरच इलेक्ट्रिक बोट सेवा, तिकीट दर किती असणार? जाणून घ्या

टीम इंडिया विरुद्ध वनडे सीरीजसाठी ऑस्ट्रेलियाचा संघ :

मिचेल मार्श (कर्णधार), जेव्हियर बार्टलेट, अ‍ॅलेक्स केरी, कूपर कोनोली, बेन ड्वार्शिस, नाथन एलिस, मार्नस लाबुशेन, जोश हेजलवुड, ट्रेविस हेड, जोश इंग्लिस (दुसऱ्या वनडेसाठी) जोश फिलिप (पहिल्या वनडेसाठी उपलब्ध), मिशेल ओवेन, मॅथ्यू रेनशॉ,मॅथ्यू शॉर्ट, मिचेल स्टार्क, अ‍ॅडम झम्पा (दुसरी वनडेसाठी उपलब्ध), मॅथ्यू कुहनेमन (पहिल्या वनडेसाठी उपलब्ध)

IND vs AUS
BMC Election : महायुतीच्या जागावाटपाआधीच रामदास आठवलेंनी बॉम्ब फोडला; मुंबईतून दोन उमेदवारांची केली घोषणा
Q

भारताविरुद्धच्या वनडे सीरीजमधून कोणता ऑस्ट्रेलियन खेळाडू बाहेर गेलाय?

A

कॅमरुन ग्रीन दुखापतीमुळे संघाबाहेर गेलाय.

Q

वनडे सीरीजमध्ये ऑस्ट्रेलियाचा कर्णधार कोण असेल?

A

मिचेल मार्श हा वनडे सीरीजमध्ये ऑस्ट्रेलियाचा कर्णधार असेल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com