Railway Station Update : मोठी बातमी! महाराष्ट्रातील आणखी एका रेल्वे स्टेशनचं नामांतर; नावात काय केला बदल? जाणून घ्या

Aurangabad Renamed : महाराष्ट्रातील आणखी एका रेल्वे स्टेशनचं नामांतर झालं आहे. जाणून घ्या नावात काय केला बदल, एका क्लिकवर
Aurangabad Renamed update
Aurangabad RenamedSaam tv
Published On
Summary

औरंगाबाद रेल्वे स्थानकाचं नाव बदलून ‘धर्मवीर छत्रपती संभाजीराजे रेल्वे स्थानक’ करण्यात आलंय

नामांतरास केंद्रीय अधिनियमानुसार महाराष्ट्र शासनाने राजपत्र जारी

माझ्या पाठपुराव्यानंतर प्रक्रिया पूर्ण झाल्याचा ठाकरे गटाच्या खासदाराचा दावा

महाराष्ट्रातील औरंगाबाद शहराचं नामांतर छत्रपती संभाजीनगर झालं असलं, तरी रेल्वे स्थानकाचं नामांतर झालं नव्हतं. आता महाराष्ट्र सरकारने केंद्रीय अधिनियमान्वये यासंदर्भात नियम आणि आदेश लागू करत ‘छत्रपती संभाजीनगर’ नाव रेल्वे स्थानकाला देण्यासंदर्भात राजपत्र जारी केलंय. आता रेल्वे स्थानकावर धर्मवीर छत्रपती संभाजीराजे यांचं नाव झळकणार आहे.

Aurangabad Renamed update
Aus vs Ban : ऑस्ट्रेलियाची धमाकेदार कामगिरी; बांगलादेशला धूळ चारत विश्वचषकाच्या सेमी फायनलमध्ये एन्ट्री

दोन वर्षापूर्वी राज्य सरकारच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत औरंगाबाद शहराचं नाव छत्रपती संभाजीनगर करण्यात आलं होतं. काही दिवसांनी संपूर्ण जिल्ह्याचं नाव छत्रपती संभाजीनगर करण्यात आलं होतं. त्यावेळी औरंगाबादसह उस्मानाबाद जिल्ह्याचं नामांतर धाराशिव करण्यात आलं होतं. त्यावेळी राज्य सरकारने राजपत्र प्रकाशित करून दोन्ही जिल्ह्यांची नावे बदलल्याचे जाहीर केले होते.

Aurangabad Renamed update
Husband kills wife : 9 महिन्यांच्या संसाराची राखरांगोळी; डॉक्टर नवऱ्याकडून बायकोची हत्या, 6 महिन्यांनी उलगडलं घटनेचं रहस्य

औरंगाबाद जिल्ह्याचं नामांतर झाल्यानंतरही रेल्वे स्टेशनच्या नावात बदल करण्यात आला नव्हता. यासाठी अनेक लोकप्रतिनिधींनी पाठपुरावा केला. त्यानंतर राज्य सरकारने केंद्रीय अधिनियमान्वये यासंदर्भात नियम आणि आदेश काढत रेल्वे स्टेशनला धर्मवीर छत्रपती संभाजीराजे नाव देण्यासंदर्भात राजपत्र जारी केलं आहे. त्यामुळे लवकरच महाराष्ट्रातील औरंगाबाद रेल्वे स्टेशनचं नाव हे धर्मवीर छत्रपती संभाजीराजे असे होईल.

या नामांतरासाठी विशेष पाठपुरावा केल्याचा दावा ठाकरे गटाचे खासदार संजय जाधव यांनी केला आहे. खासदार संजय जाधव यांनी पोस्ट करत म्हटलं की, औरंगाबाद शहरास ‘छत्रपती संभाजीनगर’ हे ऐतिहासिक नाव देऊनही रेल्वे स्थानकाच्या नामांतराची प्रक्रिया अद्याप अपूर्ण होती. यासंदर्भात आपण सातत्यानं शासनाशी संवाद साधत राहिलो, पत्रव्यवहार केला.आज आनंदाचा क्षण आहे. महाराष्ट्र शासनानं केंद्रीय अधिनियमानुसार ‘छत्रपती संभाजीनगर रेल्वे स्थानक’ या नावास अधिकृत मान्यता देत राजपत्र अधिसूचना जारी केली आहे. हा निर्णय छत्रपती संभाजीराजांच्या तेजस्वी स्मृतींना केलेलं अभिवादन आहे. यापुढे स्थानकावर छत्रपती संभाजीराजेंचं नाव अभिमानानं लिहिलं जाईल, याचा आनंद आहे'.

Aurangabad Renamed update
किन्नरांच्या दोन गटात वाद, 1,500,000,000 रुपयांची संपत्ती; इंदूरच्या सामूहिक आत्महत्या करण्याच्या प्रकरणाला वेगळं वळण

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com