Husband kills wife : 9 महिन्यांच्या संसाराची राखरांगोळी; डॉक्टर नवऱ्याकडून बायकोची हत्या, 6 महिन्यांनी उलगडलं घटनेचं रहस्य

Husband kills wife at bengaluru : बेंगळुरुत नवऱ्याने बायकोची हत्या केली. या हत्येचा उलगडा ६ महिन्यांनी उलगडला.
Crime news
Husband kills wifeSaam tv
Published On
Summary

डॉ. कृतिका रेड्डी हिच्या मृत्यूचं रहस्य ६ महिन्यानंतर उघड

पती डॉ. महेंद्र रेड्डी याने अॅनेस्थीसिया इंजेक्शन दिल्याचा उघड

कृतिकाची बहीण डॉ. निकितीला तिच्या मृत्यूवर संशय होता

डॉ. महेंद्रला मणिपाल येथून अटक

बेंगळुरुमधून धक्कादायक घटना समोर आली आहे. एका डॉक्टर पतीने बायकोची हत्या केल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. दोघांच्या लग्नाला अवघे ९ महिने झाले होते. डॉक्टर पतीच्या धक्कादायक कृत्याची सर्वत्र चर्चा होत आहे.

डॉक्टर कृतिका रेड्डी असे हत्या केलेल्या महिलेचे नाव आहे. डॉ. कृतिका ही स्किन स्पेशलिस्ट होती. तर तिचा पती डॉ. महेंद्र रेड्डी हा त्याचा रुग्णालयात जनरल सर्जन होता. कृतिका गेल्या काही दिवसांपासून आजारी होती. त्यामुळे ती वडिलांच्या घरी राहत होती. पती महेंद्र तिला अधूनमधून भेटायला यायचा. मात्र, डॉ. महेंद्रच्या डोक्यात काही वेगळंच शिजत होतं.

Crime news
Metro Mumbai 3 feeder bus Service : मेट्रो प्रवास आणखी सुकर होणार; प्रवाशांसाठी फीडर बससेवा सुरू, भाडे किती रुपये असणार?

कृतिकाची अचानक तब्येत बिघडली. त्यानंतर महेंद्रने तिला आईव्ही इंजेक्शन दिले. मात्र, २३ एप्रिल रोजीच्या रात्री कृतिकाची तब्येत आणखी बिघडली. त्यानंतर तिला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र, डॉक्टरांनी तिला मृत घोषित केलं. त्यानंतर पोलिसांनी आकस्मिक मृत्यू म्हणून नोंद केली होती.

Crime news
Kalyan Water Issue : कल्याणमध्ये पाणी समस्येवरून मनसेचा संताप; केडीएमसीच्या अधिकाऱ्याच्या खुर्चीला घातला ‘चपलेचा हार’

सहा महिन्यानंतर फॉरेन्सिक रिपोर्ट समोर आला. या रिपोर्टमध्ये कृतिकाच्या शरीरात अॅनेस्थीसिया ड्रग आढळलं. अॅनेस्थीसिया हे ऑपरेशन थिएटरमध्ये रुग्णांना शस्त्रक्रियेच्या आधी दिलं जातं. मात्र, डॉ. महेंद्रने हेतूपूर्वक कृतिकाला अॅनेस्थीसिया जास्त प्रमाणात दिलं होतं.

Crime news
Bogus Voter List : 'प्रत्येक ठिकाणी 4 लाख बोगस मतदार'; व्होटचोरीचं लोण मुंबईपर्यंत, वाचा स्पेशल रिपोर्ट

कृतिकाची बहीण डॉ. निकिती रेड्डी यांनी सुरुवातीला संशय व्यक्त केला होता. कृतिकाचा मृत्यू नैसर्गिकरित्या झाला नसल्याचं तिचा संशय होता. त्यानंतर पोलिसांनी तपास सुरु केला होता. तपासात खुलासा झाला आहे की, महेंद्र आणि त्याच्या कुटुंबावर याआधी अनेक गुन्हे दाखल झाले आहेत. महेंद्रच्या कुटुंबीयांनी लग्न जुळवण्याआधी या गोष्टी लपवल्या होत्या. पोलिसांनी या प्रकरणात डॉ. महेंद्र रेड्डी याला मणिपाल येथून अटक केली. महेंद्रला ताब्यात घेत चौकशी सुरु करण्यात आली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com