Bogus Voter List : 'प्रत्येक ठिकाणी 4 लाख बोगस मतदार'; व्होटचोरीचं लोण मुंबईपर्यंत, वाचा स्पेशल रिपोर्ट

election commission : मुंबईत 4 लाख बोगस मतदार असल्याचा खळबळजनक आरोप ठाकरेसेना आणि मनसेनं केलाय.. त्यावरुन राजकारण तापलंय.. मात्र आतापर्यंत किती जिल्ह्यातून व्होटचोरीची प्रकरणं समोर आले आहेत? आणि व्होटचोरीच्या मुद्द्यावरुन मनसे आणि ठाकरेसेनेनं निवडणूक आयोगाला कसं घेरलंय? पाहूयात या स्पेशल रिपोर्टमधून...
Voter List Scam
Voter List ScamSaam tv
Published On

राहुल गांधींनी व्होटचोरीच्या प्रकरणी आरोपांची माळ पेटवून दिली.. आता या व्होटचोरीचं लोण मुंबई, ठाणे आणि नाशिकपर्यंत पोहचलंय... संजय राऊतांनी प्रत्येक महानगरात 4 लाख बोगस मतदार असल्याचा खळबळजनक आरोप केलाय..

तर दुसरीकडे विरोधी पक्षाचे नेते निवडणूक आयोगाच्या भेटीला जाण्याआधीच संदीप देशपांडेंनीही जोगेश्वरीच्या मतदारयादीत दाक्षिणात्य भाषेत मतदारांची नावं असल्याचा मुद्दा उपस्थित केलाय... खरंतर राहुल गांधींनी महाराष्ट्रात 40 लाख व्होटचोरी झाल्याचा आरोप केला होता.. त्यानंतर व्होटचोरीवरुन मोठं धुमशान रंगलंय.. निवडणूक आयोगानेही त्यावर समाधानकारक उत्तर दिलेलं नाही.. तर राहुल गांधींच्या आरोपानंतर राज्यात व्होटचोरीच्या आरोपांची मालिकाच सुरु झालीय.

Voter List Scam
BMC Election : मोठी बातमी! राज्यातील २९ महापालिकांच्या निवडणुका कधी होणार? महत्वाची माहिती समोर

चंद्रपूरमध्ये एकाच घराच्या पत्त्यावर 119 बोगस मतदारांची नावं

चंद्रपूरच्या राजुरात 6800 मतदार वगळल्याचा आरोप

पालघरमध्ये एकाच महिलेच्या नावावर 5 मतदान कार्ड

पनवेलमध्ये 2 वेळा नावं असलेले 80 हजार मतदार

पैठणमध्येही 2 आणि 3 वेळा मतदारयादीत नावं असल्याचं उघड

एका बाजूला विरोधी पक्षाच्या नेत्यांनी थेट निवडणूक आयुक्तांची भेट घेत मतदारयादीतील घोळ आणि व्होटचोरीचं प्रकरण मांडलंय.. आता याच दरम्यान संजय राऊत आणि मनसे नेते संदीप देशपांडेंनीही बोगस मतदारांचा मुद्दा उपस्थित केल्यानं आता आयोगाची कोंडी होणार हे निश्चित आहे.. त्यामुळे आयोगाने बोलवलेल्या बैठकीत बोगस मतदारांसंदर्भात कुणाला दोषी धरलं जाणार आणि कुणावर कारवाई होणार? याकडे राज्याचं लक्ष लागलंय.

Voter List Scam
Pothole Deaths : 'खड्ड्यांमुळे मृत्यू झाल्यास वारसांना भरपाई'; मुंबई हायकोर्टाने काय निर्णय दिला? जाणून घ्या

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com