Bihar Politics : महाठग, NDAची हवा, ५ किंगमेकर नेते; महाराष्ट्राचे CM फडणवीस बिहारमध्ये प्रचाराला, सांगितलं बेरजेचं राजकारण

Bihar Political News : महाराष्ट्राचे CM फडणवीस बिहारमध्ये प्रचाराला पोहोचले आहेत. यावेळी त्यांनी इंडिया आघाडीवर टीका केली.
Bihar news
Bihar Political newsSaam tv
Published On
Summary

बिहारमध्ये विधानसभा निवडणुकांचं वातावरण तापलं, प्रचारही जोरदर सुरु

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बिहारमध्ये जाऊन एनडीएच्या उमेदवारांचा प्रचार केला

INDIA आघाडीला ‘महाठग बंधन’ म्हणत केली टीका

बिहारमध्ये पुन्हा एनडीएचं सरकार स्थापन होईल, असा फडणवीसांचा दावा

बिहारमध्ये विधानसभा निवडणुकीमुळे राजकीय रणधुमाळी पाहायला मिळत आहे. बिहारमधील विविध भागात उमेदवारांच्या प्रचाराची फेरी पाहायला मिळत आहे. भाजपने या निवडणुकीसाठी स्टार प्रचारकांची यादी जाहीर केली. यात महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांचाही समावेश आहे. याच निवडणुकीच्या प्रचारासाठी बिहारमध्ये पोहोचलेल्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी इंडिया आघाडीवर जोरदार टीका केली.

बिहारमध्ये विधानसभा निवडणुकीचं बिगुल वाजलं आहे. एनडीए आणि इंडिया आघाडीने बिहार विधानसभा निवडणुकीसाठी जोरदार तयारी केली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस देखील प्रचाराला पोहोचले. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले,'बेगूसराय किंवा बिहार असो. सर्व ठिकाणी एनडीएची हवा आहे. एनडीए सोबत लोकत आहे. बिहारच्या लोकांचं पंतप्रधान नरेंद्र मोदींवर प्रेम आहे. नेहमी बिहारने अधिकार देखील गाजवला आहे'.

'मी मानतो की, नितीश कुमार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात बिहारमध्ये एनडीएची सत्ता येईल. सरकार हे एनडीएचं स्थापन होणार आहे. मोदीजी, नितीशजी, पासवानजी, मांझीजी, कुशवहाजी हे पाच जण मिळून सरकार स्थापन करत आहे, असे ते पुढे म्हणाले.

इंडिया आघाडीवर टीका करताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, 'तुम्हा सर्वांना माहीत आहे की, हे महाठग बंधन आहे. जनता आणि सहकाऱ्यालाही फसवतात. एकमेकांना फसवण्याचं काम सुरु आहे. काही केलं तरी वरतून काही दाखवत असलं तरी आतून कधीच एक होऊ शकत नाही. सर्वजण सत्तेचे लोभी आहेत. त्यांना बिहाशी काही देणंघेणं नाही. त्यांना फक्त सत्ता हवी. यामुळे हे एकत्र येऊ शकत नाही. ना एकत्र लढू शकत नाही. माझा दावा आहे की, त्यांचा मोठा पराभव होणार आहे'.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com