Bank Of Baroda Job Saam Tv
naukri-job-news

Bank Jobs : प्रति महिना १.५ लाखांचा गलेलठ्ठ पगार, बँक ऑफ बडोदामध्ये ४१८ पदांसाठी भरती; अर्ज कसा करावा?

Bank of Baroda Recruitment 2026: बँक ऑफ बडोदामध्ये नोकरी करण्याची सुवर्णसंधी तुमच्याकडे आहे. बँकेत मॅनेजर, ऑफिसर अशा विविध पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. या नोकरीसाठी इच्छुकांनी अर्ज करायचा आहे.

Siddhi Hande

बँक ऑफ बडोदात सरकारी नोकरी

विविध पदांसाठी भरती सुरु

पगार १.५ लाखांपर्यंत

सरकारी बँकेत नोकरी करण्याची सुवर्णसंधी तुमच्याकडे आहे. बँक ऑफ बडोदामध्ये भरती जाहीर करण्यात आली आहे. बँकेत विविध पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. त्यामुळे ज्या तरुणांना सरकारी नोकरी करायची आहे त्यांच्यासाठी ह उत्तम संधी आहे.

बँक ऑफ बडोदामध्ये आयटी मॅनेजर, ऑफिसर, सिनियर मॅनेजर डेव्हलपमेंट, सीनियर मॅनेजर एआय, ऑफिसर एपीआय डेव्हलपर अशा पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. त्यामुळे विविध पदांसाठी भरती जाहीर केलेल आहे. या नोकरीबाबत तुम्हाला bankofbaroda.bank.in या वेबसाइटवर अधिसूचना जाहीर करण्यात आली आहे. या नोकरीसाठी अर्जप्रक्रिया ऑनलाइन पद्धतीने सुरु झाली आहे.

या पदांसाठी भरती

बँक ऑफ बडोदामध्ये एकूण ४१८ पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. सीनियर मॅनेजर, मॅनेजर, ऑफिसर डेव्हलपर, सीनियर मॅनेजर (एआय), ऑफिसर (API), ऑफिसर नेटवर्क एडमिनिस्ट्रेटर, ऑफिसर सर्वर एडमिनिस्ट्रेटर , सीनियर मॅनेजर डाटाबेस, मॅनेजर डाटाबेस, ऑफिसर डाटा इंजीनियर, मॅनेजर डेव्हलपर या पदांसाठी भरती जाहीर केली आहे. या नोकरीसाठी अर्जप्रक्रिया ३० जानेवारीपासून सुरु झाली आहे. या नोकरीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख १९ फेब्रुवारी २०२६ आहे.

पगार किती मिळणार?

बँक ऑफ बडोदातील या नोकरीसाठी पगार तुम्हाला पदानुसार मिळणार आहे. या नोकरीसाठी ४८,४८० ते १,०५,२८० रुपये पगार मिळणार आहे. या नोकरीसाठी २२ ते ३७ वयोगटातील उमेदवार अर्ज करु शकतात. या नोकरीसाठी तुमची निवड लेखी परीक्षा, इंटरव्ह्यू आणि कागदपत्र पडताळणीद्वारे केली जाणार आहे. त्यामुळे इच्छुक उमेदवारांनी अभ्यास करायचा आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Silver Price Today: चांदीच्या दरात विक्रमी घसरण, ५०००० रुपयांनी झाली स्वस्त; तुमच्या शहरातील आजचे दर किती?

Heart Attack: दररोज ५ किमी धावणाऱ्या ३७ वर्षीय तरुणाला २ हार्ट स्टेंट्स; हार्ट अटॅकचं 'हे' लक्षण वेळीच ओळखा

महिलेसोबत भयंकर घडलं, फ्लाइंग Kiss दिला अन् कारने पाठलाग केला, तासभरातच रोड रोमिओला अद्दल, नेमकं काय घडलं? VIDEO

Pension Hike: महत्त्वाची बातमी! EPFO कर्मचार्‍यांची पेन्शन ₹६५००नी वाढणार? सरकारने एका झटक्यात विषय संपवला

Maharashtra Live News Update: पुणे महानगरपालिकेत अजितदादांचा पुतळा उभारा, शिंदे सेनेची मागणी

SCROLL FOR NEXT