AIIMS Nagpur Recruitment 2024 Saam Tv
naukri-job-news

AIIMS नागपूरमध्ये नोकरीची संधी;पदवीधर उमेदवार करु शकतात अर्ज; पात्रता जाणून घ्या

AIIMS Nagpur Recruitment 2024: AIIMS सारख्या मोठ्या शिक्षण संस्थेत नोकरी करण्याची सुवर्णसंधी आहे. एम्स नागपूर येथे विविध पदांसाठी भरती सुरू आहे. या नोकरीसाठी अर्ज कसा करायचा ते जाणून घ्या.

Siddhi Hande

अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था म्हणजेच एम्स येथे नोकरीची सुवर्णसंधी आहे. एम्स नागपूर येथे विविध पदांसाठी भरती सुरु आहे. पदवीधर उमेदवार या नोकरीसाठी अर्ज करु शकतात. या नोकरीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ९ सप्टेंबर २०२४ आहे.

एम्स नागपूर येथे नोकरी करण्याची इच्छा असणाऱ्या तरुणांनी aiimsnagpur.edu.in वर जाऊन अर्ज करायचा आहे. या वेबसाइटवर तुम्हाला अर्जाची संपूर्ण माहिती दिली आहे. तो अर्ज डाउनलोड करुन तुम्हाला भरायचा आहे. यानंतर हा अर्ज पीडीएफ फाइलमध्ये सेव्ह करुन सबमिट करायचा आहे.

या नोकरीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे मेडिकल डिग्री असणे गरजेचे आहे. या भरतीमध्ये अर्ज करण्यासाठी तुम्हाला शुल्क जमा करावे लागेल. सामान्य प्रवर्गातील उमेदवारांसाठी ५०० रुपये शुल्क भरावे लागेल तर राखीव प्रवर्गातील उमेदवारांना २५० रुपये अर्ज फी भरावे लागेल.

या भरतीसाठी ज्या उमेदवारांनी अर्ज केला आहे त्यांना वॉक इन इंटरव्ह्यूसाठी उपस्थित राहावे लागेल. ११ सप्टेंबर २०२४ रोजी ही मुलाखत होणार आहे. यासाठी उमेदवारांना प्रशासनिक ब्लॉक, एम्स परिसर, मिहान, नागपूर, ४४११०८ येथे उपस्थित राहावे लागेल. सकाळी ९ ते ९.३० वाजेपर्यंत उमेदवारांना उपस्थित राहावे लागेल.

या नोकरीसाठी निवड झालेल्या उमेदवाराला लेवल ११ नुसार प्रत्येक महिन्याला ६७७०० रुपये वेतन दिले जाईल. ही भरती ३ वर्षांसाठी केली जाणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: मंत्रालय परिसरात झाडाची फांदी पडून पोलीस कॉन्स्टेबल जखमी

Bigg Boss 20 : 'बिग बॉस २०'च्या ३ सदस्यांवर एलिमिनेशनची टांगती तलवार, 'वीकेंड का वार'ला कोण जाणार घराबाहेर?

Aadhaar Card Update : आधार कार्डधारकांसाठी मोठी बातमी! UIDAIने बदलली Face Authenticationची पद्धत, असा होणार फायदा

Gold Rate : गणेशोत्सवात सोनं खरेदीदारांना दिलासा! १० तोळे ९२०० रुपयांनी स्वस्त, जाणून घ्या 22k, 24k, 18k चे आजचे ताजे दर

Chocolate Modak vs Mawa Modak: चॉकलेट मोदक की मावा मोदक? यंदाच्या गणेशोत्सवात लहान मुलांसाठी बनवा हे दोन्ही मोदक

SCROLL FOR NEXT