Indian Bank Recruitment
Indian Bank RecruitmentSaam Tv

Indian Bank Recruitment: इंडियन बँकेत ऑफिसर होण्याची सुवर्णसंधी;३०० जागांसाठी सुरु आहे भरती; पात्रता आणि अर्जप्रक्रिया जाणून घ्या

Indian Bank Recruitment 2024: बँकेत नोकरी करण्याची इच्छा असणाऱ्या तरुणांसाी महत्त्वाची बातमी आहे. इंडियन बँकेत लोकल ऑफिसर पदासाठी भरती सुरु आहे.
Published on

बँकेत नोकरी करण्याची इच्छा असणाऱ्या तरुणांसाठी आंनदाची बातमी आहे. इंडियन बँकेत नोकरीची सुवर्णसंधी आहे. इंडियन बँकेत लोकल ऑफिसर पदासाठी भरती सुरु आहे. जवळपास ३०० जागांसाठी ही भरती जाहीर करण्यात आली आहे. या नोकरीसाठी इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर अर्ज करावेत.

Indian Bank Recruitment
Government Bank Job: सरकारी बँकेत १९७ रिक्त जागांसाठी भरती; तब्बल १.४३ लाख मिळणार पगार, अर्ज कसा करायचा जाणून घ्या

इंडियन बँकेत नोकरीसाठी अर्जप्रक्रिया सुरु झाली आहे. indianbank.in या वेबसाइटवर जाऊन तुम्ही अर्ज करु शकतात. लोकल ऑफिसर पदासाठी भरती जाहीर केली आहे. २ सप्टेंबर २०२४ ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. अंतिम मुदतीआधी तुम्ही अर्ज करावेत.

या नोकरीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराने कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून किंवा संस्थेतून पदवी प्राप्त केलेली असावी. नोकरीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय २० ते ३० असावे. या नोकरीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख २ सप्टेंबर आहे.

Indian Bank Recruitment
Government Job: दहावी पास तरुणांसाठी सरकारी नोकरीची सुवर्णसंधी; सोलापूर महानगरपालिकेत विविध पदांची भरती, अर्ज कसा करायचा? जाणून घ्या...

अर्ज कसा करावा?

  • सर्वप्रथम तु्म्हाला इंडियन बँकेच्या अधिकृत वेबसाइट म्हणजेच indianbank.in वर जावे लागेल.

  • यानंतर भरतीसंबंधित लिंकवर क्लिक करा.

  • यानंतर नवीन पोर्टलवर जाऊन Click Here For New Registration वर क्लिक करा.

  • यानंतर अर्जदाराने माहिती भरावी. त्यानंतर फोटो आणि सही अपलोड करावी.

  • यानंतर फॉर्म भरल्यानंतर शुल्क भरावे. त्यानंतर प्रिंटआउट काढून ठेवावे.

अर्ज करण्यासाठी उमेदवारांना १००० रुपये शुल्क भरावे लागणार आहे. राखीव प्रवर्गातील उमेदवारांना १७५ रुपये अर्ज शुल्क भरावे लागणार आहे.

Indian Bank Recruitment
MSRTC Recruitment: एसटी महामंडळात नोकरीची सुवर्णसंधी;१०वी-१२वी पास उमेदवार करु शकतात अर्ज;जाणून घ्या सविस्तर

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com