Aviation Job Saam Tv
naukri-job-news

Aviation Job: सरकारी नोकरीची सुवर्णसंधी; पदवीधर तरुणांना मिळणार भरघोस पगार;जाणून घ्या सविस्तर

AIESL Aviation Company Recruitment: सरकारी नोकरीच्या शोधात असणाऱ्या तरुणांसाठी आनंदाची बातमी आहे. AIESL या विमान कंपनीत विविध पदांसाठी भरती सुरु आहे.

Siddhi Hande

नोकरीच्या शोधात असणाऱ्या तरुणांसाठी आनंदाची बातमी आहे. एआय इंजिनियरिंग सर्विस लिमिटेड या विमान कंपनीत नोकरीची सुवर्णसंधी आहे. सरकारी नोकरी करण्याची इच्छा असणाऱ्या तरुणांनी या नोकरीसाठी अर्ज करावेत.

एआयईएसएल कंपनीत सिक्युरिटी ऑफिसर आणि असिस्टंट सुपरवायजर पदासाठी भरती सुरु आहे. या नोकरीसाठी इच्छुक उमेदवारांनी www.aiesl.in या वेबसाइटवर जाऊन अर्ज करायचा आहे. या नोकरीबाबत अधिसूचना जारी करण्यात आली आहे.

एआयईएसएलमध्ये नोकरीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख २४ सप्टेंबर २०२४ आहे. एआयईएसएल ही एविएशन सेक्टरमधील मोठी कंपनी आहे. या कंपनीत विमानांच्या मेटेंनेंस आणि रिपेअरिंगचे काम केले जाते.त्यामुळे या कंपनीत काम करण्याची संधी तरुणांना मिळणार आहे.

रिजनल सिक्युरिटी ऑफिसर पदासाठी ३ जागा रिक्त आहेत तर असिस्टंट सुपरवाइजर पदासाठी ७३ जागा रिक्त आहेत. एकूण ७६ जागांवर ही भरती करण्यात येणार आहे.रिजनल सिक्युरिटी ऑफिसर आणि असिस्टंट सुपरवायजर पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराने मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवी प्राप्त केलली असावी. याचसोबत इंग्रजी, हिंदी आणि प्रादेशिक भाषांचे ज्ञान असणे गरजेचे आहे.

रिजनल सिक्युरिटी ऑफिसर पदासाठी कमाल वयोमर्यादा ४० वर्ष निश्चित करण्यात आली आहे तर असिस्टंट सुपरवायजर पदासाठी ३५ वर्ष वयोमर्यादा निश्चित करण्यात आली आहे. रिजनल सिक्युरिटी ऑफिसर पदासाठी ४७,६२५ रुपये पगार तर असिस्टंट सुपरवायजर पदासाठी २७,९४० रुपये पगार मिळणार आहे.

या नोकरीसाठी उमेदवारांची निवड लेखी परीक्षा आणि मुलाखतीद्वारे केली जाणार आहे. अर्ज करताना तुम्हाला गुगल फॉर्म भरावा लागेल. या फॉर्मची प्रिंट आउट तुम्हाला चीएफ एचआर ऑफिसर, एआय इंजिनियरिंग सर्विस लिमिटेड, पर्सनल डिपार्टमेंट, २ फ्लोर, सीआरए बिल्डिंग, नवी दिल्ली-११०००३ येथे १४ सप्टेंबरपर्यंत पाठवायचा आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Today Horoscope: आज होणार अचानक धनलाभ, तर अनेकांचे जुळेल प्रेम; यात तुमची रास तर नाही ना?

Kolhapur Politics: मधुरिमाराजेंच्या माघारीची INSIDE STORY; कोल्हापूर उत्तर मतदारसंघात काय घडलं?

Assembly Election: एकनाथ शिंदे आणि राज ठाकरेंमध्ये संघर्ष; शिंदेविरुद्ध दोन ठाकरे

Maharashtra Election: महायुतीनं केलंय काम भारी! लाडक्या बहिणींना मिळणार २१०० रुपये, कोल्हापुरात महायुतीची १० वचनं

Maharashtra News Live Updates: भाजपचा मनसेचे उमेदवार बाळा नांदगावकर यांना पाठिंबा

SCROLL FOR NEXT