PMC Recruitment: पुणेकरांनो, महानगरपालिकेत नोकरीची सुवर्णसंधी; ६८२ पदांसाठी सुरु आहे भरती; अशा पद्धतीने करा अर्ज

10th, 12th And Graduate Student Job: १० वी, १२ वी तसेच पदवीधर उत्तीर्ण तरूणांसाठी पुणे महानगरपालिकेत नोकरीची सुवर्णसंधी आहे.
 PMC Recruitment
PMC RecruitmentSaam Tv
Published On

पुणे महानगर पालिकेमध्ये नोकरीची सुवर्णसंधी आली आहे. महाराष्ट्र शासनातर्फे मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत ही भरती आहे. ही भरती संपूर्ण ऑनलाईन पद्धतीने असेल. १२ वी तसेच आय. टी. आय. उत्तीर्ण उमेदवार या अर्जासाठी पात्र असतील.

समाज विकास विभाग तसेच पुणे महानगरपालिकेतर्फे सरकारी नोकरीसाठी तरूण अर्ज करू शकतात. ही भरती प्रक्रिया राज्य सरकारद्वारे केली जात आहे. संगणक चालक, माळी, पंप ऑपरेटर या पदासाठी ०६८२ रिक्त जागा आहेत. १० वी, १२ वी तसेच पदवीधर आणि आय. टी. आय. उत्तीर्ण तरूण यासाठी पात्र असतील.

इच्छुक उमेदवारांना मराठी आणि इंग्रजी टायपिंग येणे आवश्यक आहे. उमेदवार हा MSCIT उत्तीर्ण असे आवश्यक आहे.वेल्डिंग पदासाठी आयटीआय उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. टर्नर पदासाठीदेखील आयटीआय उमेदवार अर्ज करु शकतात. ज्युनियर इंजिनियर पदासाठी उमेदवाराने सिव्हिल इंजिनियर पदवी प्राप्त केली असावी. ६८२ रिक्त जागांसाठी ही भरती करण्यात येणार आहे.

या पदासाठी निवड झालेल्या १२ वी उत्तीर्ण तरूणांना ६००० रूपये, आय. टी. आय उत्तीर्ण तरूणांना ८,००० रूपये आणि पदवीधर उत्तीर्ण तरूणांना १०,००० रूपये मासिक वेतन मिळेल. १८ ते ३२ वयोगटातील उमेदवार या पदासांठी अर्ज करू शकतात. अर्ज करण्याची शेवटची तारीख ३० सप्टेंबर २०२४ पर्यंत आहे. इच्छुक उमेदवारांनी अधिक माहितीसाठी वेबसाइटला भेट द्या.

याचसोबत सध्या महाराष्ट्र सुरक्षा महामंडळात नोकरीची संधी आहे. ऑफिस असिस्टंट आणि कॉम्प्युटर टेक्निशियन पदासाठी ही भरती करण्यात येणार आहे. या नोकरीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख १८ सप्टेंबर आहे.

 PMC Recruitment
Farmer ID Card: आता प्रत्येक शेतकऱ्याला नवीन ओळखपत्र; मोदी सरकारचा नवा प्लॅन, काय फायदा होणार? जाणून घ्या

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com