Jyoti Malhotra Instagram
देश विदेश

Jyoti Malhotra : घर का भेदी लंका ढाए... गद्दार ज्योतिचा भारतविरोधी कट?

Jyoti Malhotra : घर के भेदी लंका ढाए, असं म्हणतात.... पण अगदी तसंच प्रकरण समोर आलंय.. हरियाणातील युट्यूबर ज्योती मल्होत्रानं देशाशी आणि मातीशी गद्दारी केलीय... या गद्दारीत कोण कोण सहभागी आहे? आणि ज्योतीचे कारनामे कसे उघड झालेत? पाहूयात या स्पेशल रिपोर्टमधून...

Yash Shirke

हा व्हिडीओतील चेहरा नीट निरखून पाहा.... म्हणतात ना... चेहरा भोळा आणि भानगडी सोळा.....हे वाक्य लागू होतंय युट्यूबर गद्दार ज्योति मल्होत्राला..... कारण याच सुंदर चेहऱ्यामागे लपलाय देशद्रोही चेहरा...कारण हरयाणा पोलिसांच्या सुत्रानुसार याच ज्योति मल्होत्राचं थेट पाकिस्तानी गुप्तहेर संघटना आयएसआयशी कनेक्शन समोर आलंय..... ज्योतिनं देशासंबंधित संवेदनशील आणि ऑपरेशन सिंदूरची माहिती पाकला दिल्याचं समोर आलंय...त्यामुळेच हरियाणा पोलिसांनी ज्योति मल्होत्रासह 6 जणांच्या मुसक्या आवळल्यात....

प्रसिद्ध ट्रॅव्हल्स ब्लॉगर ज्योति 2023 मध्ये पाकिस्तान दौऱ्यावर गेली होती.... त्याच वेळी तिचं पाकिस्तानी उच्चायोगातील कर्मचारी दानिश आणि त्यानंतर त्याचा साथीदार अली एहसानसोबत ओळख झाली.. त्या ओळखीचं रुपांतर मैत्रीत झालं आणि त्यानंतर ज्योति थेट पाकिस्तानी गुप्तचर अधिकाऱ्यांच्या संपर्कात गेली.... ज्योति पाकिस्तानी गुप्तहेरांना इंडोनेशियाच्या बालीमध्ये भेटली.... तर पहलगाम हल्ल्याआधी ज्योती 2 वेळा पहलगामला गेल्याचंही समोर आलंय....त्यातूनच ज्योतिचा भांडाफोड झालाय...

डिसेंबर आणि जानेवारीमध्ये ज्योतिची पहलगामला भेट

चीन भेटीत ज्योतिला व्हिआयपी ट्रिटमेंट, त्यानंतर गुप्तहेर संस्थांच्या रडारवर

13 मे

दानिशचा गुप्तहेर कारवायांमध्ये सहभाग आढळल्यानं देश सोडण्याचे आदेश

दानिशचं कनेक्शन तपासताना धागेदोरे ज्योतिपर्यंत पोहचले

दानिशचा गजाला नावाच्या महिलेसोबतचा आर्थिक व्यवहार उघड

ज्योतिच्या चौकशीतून आणखी 6 जणांचा सहभाग उघड

नूँहचा अरमान, 32 वर्षीय गजाला, यामीन मोहम्मद आणि देविंदर सिंह ढिल्लोला अटक

भारतीय लष्कराची संवेदनशील माहिती शत्रूराष्ट्र पाकिस्तानला देणाऱ्यांमध्ये ज्योति ही पहिलीच गद्दार नाही... तर याआधीही अशाच गद्दारांच्या मुसक्या आवळण्यात आल्यात... हे गद्दार नेमके कोण आहेत? पाहूयात...

2007

IFS अधिकारी माधुरी गुप्तानं ISI ला गोपनिय माहिती पाठवली

धृव सक्सेना- आर्मीची संवेदनशील माहिती फोडली

डॉ. प्रदीप कुरुलकर, DRDOची माहिती पाकला पुरवली

2017

संदीप शर्मा- देशासंबंधी गुप्त माहिती पाकला पुरवल्या प्रकरणी अटक

रकीब खान

भटिंडा लष्करी छावणीचे फोटो पाकला पाठवले

सुनील कुमार रामने लष्करी युनिट्सचे लोकेशन पाठवल्याचं उघड

रविंद्र कुमार आणि शाहबाज खानने देशासंबंधी गुप्त माहिती पाकला पाठवली

घर का भेदी लंका ढाए असं म्हणतात ते खरंय... त्यामुळेच प्रदीप कुरुलकर असो वा ज्योति मल्होत्रा अशा घरभेदी गद्दारांना कठोर शिक्षा करण्याची गरज आहे. ज्यामुळे देशाशी गद्दारी करण्याची हिंमत कुणी करणार नाही... याबरोबरच पोलिसांनीही ज्योति मल्होत्राच नाही तर अशा गद्दारांचं नेटवर्क उद्ध्वस्त करण्याची गरज आहे....

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune MNS : 'ठाण्याचा वाघ गुजरातच्या पिंजऱ्यात'; पुण्यात मनसेचं आंदोलन, एकनाथ शिंदेंचा केला निषेध

Maharashtra Live News Update: ठाण्याचा वाघ गुजरातच्या पिंजऱ्यात; पुण्यात मनसेकडून एकनाथ शिंदेंचा निषेध

Raj Thackeray: राज ठाकरेंच्या बापाचा महाराष्ट्र आहे का? भाजपचे माजी प्रवक्ता नवीन जिंदाल यांचं ट्विट | VIDEO

National Pension Scheme: केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी; सरकारच्या 'या' योजनेवर मिळणार नवीन सूट

Water Drinking Rules: पाणी पिण्याचे 'हे' 4 सोपे नियम पाळा, आणि आजारांपासून दूर राहा

SCROLL FOR NEXT