सोलापूरमध्ये अग्नितांडव! कारखान्याच्या आगीत मालकासह ४ कुटुंबियांचा मृत्यू, एका वर्षाच्या चिमुकल्याचाही समावेश

Solapur News : सोलापूरच्या अक्कलकोट एमआयडीसी रोड मधील सेंट्रल इंडस्ट्रीज कारखान्यात लागलेल्या आगीत तब्बल ८ जणांचा गुदमरून मृत्यू झाला आहे. यात कारखान्याचे मालक आणि त्यांच्या कुटुंबाचा दुर्दैवी अंत झाला आहे.
Solapur News
Solapur NewsSaam Tv
Published On

विश्वभूषण लिमये, साम टीव्ही, प्रतिनिधी

सोलापूरमधील अक्कलकोटच्या एमआयडीसी रोड येथील सेंट्रल इंडस्ट्रीज या कारखान्यात आग लागली. यात तब्बल ८ जणांचा गुदमरून मृत्यू झाला. ज्या लोकांना कारखान्यातून बाहेर काढण्यात आले, ते देखील मृत अवस्थेत असल्याची माहिती समोर आली आहे. मृत्यूमुखी पडलेल्यांमध्ये कारखान्याचे मालक, त्यांचा मुलगा, त्याची पत्नी आणि एक वर्षाच्या मुलाचा समावेश आहे. संध्याकाळी आग पुन्हा धुमसल्याची माहिती मिळाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, अक्कलकोटच्या एमआयडीसी रोड येथील सेंट्रल इंडस्ट्रीज कारखान्यात पहाटे साडेपाचच्या सुमारास तीन कामगारांचा मृत्यू झाला होता. सेंटर इंडस्ट्रीजचे मालक आगीत अडकल्याने त्यांना शोधण्यासाठीची मोहीम पहाटेपासून सुरु होती. सर्वजण मास्टर बेडरूममध्ये लपून बसले होते. दुर्दैवाने त्यांना बाहेर पडला आले नाही. श्वास गुदमरुन आणि होरपळून त्यांचा जागीच मृत्यू झाला.

Solapur News
Solapur fire : सोलापुरात टॉवेल कारखान्यात अग्नितांडव, ८ जणांचा मृत्यू, कुटुंबाचाही गुदमरून मृत्यू

आगीत मृत्यूमुखी पडलेल्यांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी सोलापूरच्या शासकीय रुग्णालयाकडे पाठवण्यात आले. आगीमध्ये ५ पुरुष, २ महिला आणि एका बालकाचा दुर्दैवी अंत झाला आहे. यात कारखान्याचे मालक उस्मान मन्सूरी, मालकाचा मुलगा अनस मन्सूरी (वय २५), त्याची पत्नी शिफा (वय २४) आणि त्याचा एका वर्षाचा मुलगा युसुफ यांचा समावेश आहे.

Solapur News
Pune News : हुंड्यासाठी छळ अन्...; अजितदादांच्या बड्या नेत्याच्या सुनेनं जीवन संपवलं, पुण्यातील NCP चा शिलेदार कारवाईच्या भोवऱ्यात

या प्रकरणाची सविस्तर चौकशी व्हावी अशी विनंती सरकारकडे करण्यात आली आहे. आग विझवण्यात महापालिकेची यंत्रणा कमी पडल्याचा आरोप केला जात आहे. आग विझवण्यासाठी पाणी कमी पडत होते. जिल्हाधिकाऱ्यांना फोन करुन खासगी टँकरनी पाणी मागवून घेण्यात आले. आगीवर नियंत्रण मिळवल्यानंतर काहीतासांमध्ये आग पुन्हा धुमसली. अग्नितांडवावर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रयत्न सुरु असल्याची माहिती समोर आली आहे.

Solapur News
आत्महत्या करण्यासाठी महिलेने कालव्यात मारली उडी, वाचवण्यासाठी हवालदार धावला; महिला वाचली पण हवालदाराने जीव गमावला

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com