IPL 2025 दरम्यान सनरायजर्स हैदराबादच्या स्टार खेळाडूला Covid-19 ची लागण, SRH च्या कोचने दिली धक्कादायक माहिती

IPL 2025 News : स्थगितीनंतर आयपीएल २०२५ ला पुन्हा सुरुवात झाली आहे. याच दरम्यान एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. सनरायजर्स हैदराबादच्या एका खेळाडूला करोनाची लागण झाली आहे.
IPL 2025 Covid News
IPL 2025 Covid NewsX
Published On

IPL 2025 चा पुन्हा श्रीगणेशा झाला आहे. स्थगितीनंतर काल १७ मे रोजी आयपीएल पुन्हा सुरु झाले. कालचा सामना पावसामुळे रद्द झाला. भारत पाकिस्तान यांच्यातील तणावामुळे आयपीएल स्थगित करण्यात आले होते. आता आयपीएलशी संबंधित धक्कादायक माहिती समोर आली आहे. सनरायजर्स हैदराबादचा स्टार फलंदाज ट्रॅव्हिस हेडला कोव्हिड-१९ चा संसर्ग झाला आहे.

सनरायजर्स हैदराबादचे हेड कोच डॅनियल विटोरी यांनी रविवारी (१८ मे) ट्रॅव्हिस हेड संबंधित माहिती दिली. भारत पाकिस्तान यांच्यात युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाल्याने इतर आंतरराष्ट्रीय खेळाडूंप्रमाणे हेड सुद्धा मायदेशी म्हणजेच ऑस्ट्रेलियाला पोहोचला होता. तेथे त्याला करोना व्हायरसची लागण झाली. त्यामुळे तो लगेच भारतात परतणार नसून हैदराबाद विरुद्ध लखनऊ सामने खेळू शकणार नाही. सोमवारी (१९ मे) ट्रॅव्हिस हेड भारतात पोहोचेल. पण पुढच्या सामन्यात त्याचा समावेश केला जाईल की नाही हे चौकशीनंतरच ठरवले जाईल. हेडला कोव्हिड १९ चा संसर्ग झाल्याची माहिती समोर आल्याने मोठी खळबळ उडाली आहे.

IPL 2025 Covid News
MS Dhoni चे फॅन्स सच्चे, बाकीचे पैसे घेतात.. Paid Fans म्हणत हरभजन सिंहने कोणावर निशाणा साधला?

पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा बदला भारताने ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून घेतला. पण भेकड पाकिस्तानने चवताळून भारतावर हल्ले करण्याचा प्रयत्न केला. हे हल्ले भारताने परतवून लावले. भारत आणि पाकिस्तान तणावादरम्यान आयपीएल २०२५ एका आठवड्यासाठी स्थगित करण्यात आले. सुरक्षेच्या कारणास्तव दुसऱ्या देशातील खेळाडू त्यांच्या-त्यांच्या देशात परतले. यात ट्रॅव्हिस हेडचा देखील समावेश होता. ऑस्ट्रेलियामध्ये गेल्यानंतर हेड करोनाग्रस्त झाला.

IPL 2025 Covid News
आत्महत्या करण्यासाठी महिलेने कालव्यात मारली उडी, वाचवण्यासाठी हवालदार धावला; महिला वाचली पण हवालदाराने जीव गमावला

गेल्या ४ वर्षात आयपीएलमध्ये करोना व्हायरसच्या संसर्गाची ही पहिलीच घटना आहे. यापूर्वी आयपीएल २०२१ मध्ये करोना व्हायरसची प्रकरणे आढळली होती. त्यानंतर आयपीएल लीग स्पर्धी मध्येच थांबवण्यात आली होती. त्यानंतर काही महिन्यांनी उर्वरित सामने यूएईमध्ये आयोजित करण्यात आले होते.

IPL 2025 Covid News
“बाई आणि बाटली या दोन गोष्टींपासून दूर राहायचं”, प्रसिद्ध अभिनेत्याने लेकाला दिला सल्ला

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com