world largest residential building saam tv
देश विदेश

World Largest Building: जगातील सर्वात मोठी बिल्डिंग कुठे आहे माहितीये का?

world largest residential building : चीनमध्ये एक इमारत आहे ज्यात २० हजारहून अधिक लोक राहतात. ही इमारत ३९ मजल्यांची आहे. याची लांबी ६७५ फूटांची आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

चीन देश प्रत्येक वेळी वेगवेगळ्या वस्तुंचा किंवा गॅजेट्सचा शोध लावत असतो. या गोष्टी सोशल मीडीयावर प्रचंड वायरल होत असतात. तशीच एक मोठी गोष्ट आता समोर आली आहे. चीनमध्ये एक इमारत आहे. ज्यात २० हजारहून अधिक लोक राहतात. ही इमारत ३९ मजल्यांची आहे. याची लांबी ६७५ फूटांची आहे. विशेष म्हणजे या इमारतीचा आकार 'एस' (s) शेप मध्ये आहे. ही इमारत चीन मधल्या हांग्जो किआनजियांग सिटीमध्ये आहे.

चीनमधील या इमारतीला 'रिजेंट इंटरनॅशनल' या नावाने सुद्धा ओळखले जाते. या इमारती ऐवजी हॉटेल उभारण्यात येणार होते. मात्र तसे न होता हॉटेलचे इमारतीत रुपांतर झाले. ही इमारत १.४७ दशलक्ष स्क्वेअर मीटर पसरट आहे. तसेच या इमारतीत सगळ्या सोयी-सुविधा रहिवाशांना देण्यात येतात. त्यामुळे तिथले रहिवासी दुसऱ्या जागी जात नाहीत.

रिजेंट इंटरनॅशनल इमारतीच्या आजूबाजुच्या परिसरात शॉपिंग सेंटर्स, रेस्टॉरंट, शाळा, महाविद्यालय, मार्केट, सलोन, गार्डन , हॉस्पिटल , स्विंमिंग पूल या जीवना आवश्यक वस्तू या इमारतीच्या शेजारी आहेत. चीनमध्ये या इमारतीत राहणाऱ्यांना ' सेल्फ कंटेंड कम्युनिटी ' असे म्हणतात. या इमारीचे आणखी एक वेगळेपण म्हणजे इथल्या घरांना 'खिडक्या' नाहीत. या इमारतीत कोणत्याच घराला खिडकीचे बांधकाम केलेले नाही. त्यामुळे बरेच रहिवासी आकर्षक होवून या भागात राहायला जातात.

चीनच्या रिजेंट इंटरनॅशनल इमारतीतील एका खोलीचे भाडे १,५०० म्हणजे भारतीय चलनात १७,००० रुपये आहे. त्यात ज्या भाडेकरुंना मोठे अपार्टमेंट घ्यायचे असेल तर त्याची किंमत ४,००० युएन म्हणजे भारतीय चलनानुसार ४८,००० रुपये आहे. या इमारतीत सध्या वीस हजार लोक राहत असले तरी अजून १० हजार लोक तिथे राहू शकतात. असे तिथल्या रहिवाशांचे मत आहे.

Edited By : Sakshi Jadhav

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

डेंग्यूच्या आजाराचा डास कसा ओळखाल?

वेताळवाडी किल्ल्यावर टोळक्यांची हुल्लडबाजी, पंचधातूची तोफ कोसळली, एक जण जखमी

Kiku Sharda: मी नेहमी शोसोबत...; द ग्रेट इंडियन कपिल शो सोडण्याबाबत किकू शारदाने व्यक्त केल्या भावना, म्हणाला...

Anant Chaturdashi 2025 live updates : लालबागचा राजा मंडपातून बाहेर; फुलांचा वर्षाव करत मानवंदना; VIDEO

Maharashtra Live News Update: पुण्यातील दगडूशेठ गणपती मिरवणुकीच्या रथाला आकर्षक रोषणाई

SCROLL FOR NEXT