Dharmendra Pradhan and Sambit Patra Saam Tv
देश विदेश

Odisha News: ओडिशाचे नवे मुख्यमंत्री कोण होणार? धर्मेंद्र प्रधान, संबित पात्रा शर्यतीत; आज होणार घोषणा

Who will be Odisha’s new CM: ओडिशाच्या मुख्यमंत्रीपदासाठी ज्या नावांचा विचार केला जात आहे, त्यात माजी केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान, माजी केंद्रीय आदिवासी व्यवहार मंत्री जुआल ओरम, संबित पात्रा यांचा समावेश आहे.

साम टिव्ही ब्युरो

ओडिशामध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपने मोठा विजय मिळवला आहे. आता राज्याचा पुढचा मुख्यमंत्री कोण होणार, हे शनिवारी जाही केलं जाऊ शकतं. मुख्यमंत्र्यांच्या नावावर सस्पेन्स असताना, राज्यातील एका ज्येष्ठ आदिवासी भाजप आमदाराने शुक्रवारी सांगितले की, पक्ष शनिवारी बैठक घेऊन नावाची घोषणा करेल. केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान, संबित पात्रा आदींच्या नावांची चर्चा झाली आहे.

संबलपूर जिल्ह्यातील कुचिंदा येथील ज्येष्ठ आमदार रविनारायण नाईक यांनी शुक्रवारी सांगितले की, राज्य विधिमंडळ पक्षाची भुवनेश्वरमध्ये बैठक होईल आणि 10 जून रोजी भाजप सरकारच्या शपथविधी समारंभाच्या आधी नावाची घोषणा केली जाईल.

"संसदीय पक्ष शुक्रवारी नवीन मुख्यमंत्र्याबाबत निर्णय घेण्याची शक्यता असून शनिवारी औपचारिक घोषणा केली जाईल," असे नाईक म्हणाले. भाजपचे संसदीय मंडळ हे उमेदवार निवडीपासून सरकार स्थापनेपर्यंत आणि मुख्यमंत्र्यांच्या निवडीपर्यंत सर्व महत्त्वाच्या मुद्द्यांवर निर्णय घेतं. सर्वोच्च नेतृत्वाने ओडिशातील भाजपच्या सर्व 20 खासदारांचा सल्ला घेतला आहे, असं बोललं जात आहे.

पक्षाच्या सूत्रांनी सांगितले की, मुख्यमंत्रीपदासाठी माजी केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान, माजी केंद्रीय आदिवासी व्यवहार मंत्री जुआल ओरम, नवनिर्वाचित पुरी खासदार संबित पात्रा, राष्ट्रीय उपाध्यक्ष बैजयंत पांडा यांच्या नावाची चर्चा आहे.

दरम्यान, भुवनेश्वरमधील जनता मैदानावर होणाऱ्या शपथविधी सोहळ्याला 30,000 हून अधिक लोक उपस्थित राहणार आहेत. नवीन मंत्रिमंडळाच्या शपथविधी समारंभावर देखरेख ठेवण्यासाठी राज्य सरकारने 9 आयएस, एक ओएफएस आणि 40 इतर वरिष्ठ ओएएस अधिकाऱ्यांसह 50 वरिष्ठ अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्याचा निर्णय घेतला आहे. भाजप नेते आणि प्रवक्ते सज्जन शर्मा म्हणाले की, शपथविधी सोहळ्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा तसेच एनडीए शासित राज्यांचे मुख्यमंत्री उपस्थित राहणार आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

भाजप मंत्र्याच्या मुलाचा माज, कारने अनेकांना उडवलं; नंतर जमलेल्या स्थानिक लोकांवर पिस्तुल ताणली

Iran vs US Tensions: खामेनेईंच्या टार्गेटवर सुन्नी देश, इराणचे खतरनाक चार प्लॅन

Crime News: दिप्तीनंतर आता कीर्ती! बाथरुममध्ये कोंडलं, बेदम मारलं; १०लाखांसाठी अमानुष छळ; आणखी एका विवाहितेनं संपवलं आयुष्य

चंद्रपूरचा महापौर भाजपचा की काँग्रेसचा? महापालिकेची सूत्रं 'मातोश्री'च्या हाती? VIDEO

Special Report : महायुतीत ठणाठणी! शिंदेसेनेचं भाजपच्या नाईकांना ओपन चॅलेंज

SCROLL FOR NEXT