Nitish Kumar: नितीश-मोदींचं मनोमिलन, सोबत राहण्याचं दिलं आश्वासन

NDA Government: देशाच्या राजकारणात पलटूराम अशी ख्याती असलेल्या नितीश कुमार यांनी एनडीएच्या बैठकीत मोदींच्या पाया पडत निष्ठा दाखवण्याचा प्रयत्न केला. तसंच आपण मोदींसोबत असल्याचाही निर्धार व्यक्त केला.
नितीश-मोदींचं मनोमिलन, सोबत राहण्याचं दिलं आश्वासन
Pm Narendra Modi and Nitish KumarSaam tv

भरत मोहळकर, साम टीव्ही, प्रतिनिधी

लोकसभेचा निकाल लागला आणि 12 खासदार असलेला नितीश कुमार यांचा जनता दल युनायटेड राष्ट्रीय राजकारणाच्या केंद्रस्थानी आला. त्यातच एनडीएच्या बैठकीत नितीश कुमारांनी आपल्या भाषणानंतर थेट पंतप्रधान मोदींचे पाया पडण्याचे प्रयत्न करत निष्ठा दाखवण्याचा दाखवण्याची सूचक कृती केली. तसंच आपल्या भाषणातही त्यांनी मोदींसोबतच राहणार असल्याचा निर्धार व्यक्त केला. नितीश कुमार म्हणाले आहेत की, आम्ही सर्व दिवस मोदींसोबत राहू. मोदी जे सांगतील तसंच होईल.

नितीश कुमारांनी पाच वर्षात तीन वेळा वेगवेगळ्या पक्षांसोबतची युती तोडत चारच महिन्यांपूर्वी चौथ्यांदा मुख्यमंत्रिपद कायम राखलं. त्यामुळं देशभरात नितीश कुमार यांची ख्याती ही पलटूराम अशीच आहे. त्यांनी बिहारमध्ये यापूर्वी कशा पलट्या मारल्या आहेत ते जाणून घेऊ...

नितीश-मोदींचं मनोमिलन, सोबत राहण्याचं दिलं आश्वासन
Amit Shah यांचा राजीनामा न देण्याचा Devendra Fadnavis यांना सल्ला

नितीश कुमारांच्या पलट्या

1998 - नितिश कुमार एनडीएमध्ये सहभागी झाले

2014 - भाजपनं पंतप्रधानपदासाठी मोदींचं नाव पुढे केल्यामुळे एनडीएतून बाहेर पडले

2014 - आरजेडी आणि काँग्रेससोबत आघाडी केली

2015 - बिहार विधानसभा निवडणुकीत नितीश कुमारांनी भाजपचा पराभव केला

2017 - आघाडीतून बाहेर पडत एनडीएत सहभागी झाले आणि भाजपसोबत सत्ता स्थापन केली

2020 - नितीश कुमारांनी भाजपसोबत विधानसभा निवडणूक लढवली

2022 - भाजपची साथ सोडली. आरजेडी, काँग्रेससोबत बिहारमध्ये सत्ता स्थापन केली

2024 - लोकसभा निवडणुकीपूर्वी नितीश कुमार इंडिया आघाडीतून बाहेर पडले आणि पुन्हा एनडीएसोबत गेले

नितीश-मोदींचं मनोमिलन, सोबत राहण्याचं दिलं आश्वासन
Prashant Kishor On Election: लोकसभा निकालाची भविष्यवाणी ठरली फोल; चूक मान्य करत प्रशांत किशोर यांनी केली मोठी घोषणा

वेगवेगळ्या पक्षांसोबत आघाडी आणि युती करून नितीश कुमार गेल्या 30 वर्षात 10 वेळा मुख्यमंत्री झालेत. नितीश कुमार आता एनडीएसोबत असले तरी उद्या आमच्यासोबत असतील, असं म्हणत संजय राऊतांनी सूचक वक्तव्य केलंय.

मोदींची पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणून घोषणा झाल्यानंतर नितीश कुमार यांनी पहिल्यांदा एनडीएला सोडचिठ्ठी दिली होती. मात्र त्यांनंतर सत्ता टिकवण्यासाठी ते आपल्या सोयीनुसार कधी मोदींच्या जवळ आले तर कधी दूर गेले. त्यामुळे आता मोदी-नितीश साथ साथ दिसत असले तरी भविष्यात मोदींची धोरणं गैरसोयीची झाल्यास नितीश कधी पटली मारतील याचा नेम नाही.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com