Pune : ठेकेदार, कंत्राटदारांना सोबत घेऊन निवडणुका जिंकता येत नाहीत, भाजप पदाधिका-याची देवेंद्र फडणवीसांवर टीका

यशवतंभाऊ भाेसले यांनी केंद्रात तिसऱ्यांदा परत एकदा मोदी सरकार आल्याबद्दल काैतुक केले तर राज्यातील महायुतीच्या पराभवावरुन देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वावर बोचरी टीका केली.
yashwantbhau bhosale criticizes devendra fadnavis on lok sabha election result of maharashtra
yashwantbhau bhosale criticizes devendra fadnavis on lok sabha election result of maharashtraSaam Digital

ठेकेदार, कंत्राटदार यांना सोबत निवडणुका जिंकता येत नाहीत श्रमिक आणि कष्टकऱ्यांचे प्रश्न सोडवून त्या जिंकता येतात अशी टीका भारतीय जनता पक्ष प्रणित राष्ट्रीय श्रमिक आघाडीचे अध्यक्ष तसेच ज्येष्ठ कामगार नेते यशवंतभाऊ भोसले यांनी भाजपचे नेते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह राज्यातील महायुती सरकारवर केली आहे. यशवंतभाऊ भोसले हे पत्रकार परिषदेत बाेलत हाेते.

यशवंतभाऊ भोसले म्हणाले गेल्या 10 वर्षात मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी आम्हाला श्रमिक आणि कष्टकऱ्यांच्या प्रश्नांसाठी साधी वेळ देखील दिली नाही. आता तरी राज्यातील भाजप नेत्यांनी आत्मपरीक्षण करावं तरच आगामी काळातील विधानसभा निवडणुकीत यश मिळवता येईल असा भाजपला घरचा आहेरच यशवंतभाऊंनी दिला.

yashwantbhau bhosale criticizes devendra fadnavis on lok sabha election result of maharashtra
Pimpri Chinhcwad : ऑनलाइन टास्क देत 20 कोटींचा घातला गंडा, सायबर गुन्हे शाखेने 8 जणांना ठाेकल्या बेडया (पाहा व्हिडिओ)

लोकसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्ष आणि महायुतीला आलेल्या अपयशाची जबाबदारी देवेंद्र फडणवीस यांनी स्वीकारल्याबद्दल यशवंतभाऊंनी एकीकडे त्यांच्या प्रामाणिकपणाचे कौतुक केले. तर दुसरीकडे देवेंद्र फडणवीस हे सत्तेत असताना ठेकेदार व कंत्राटदार यांना सोबत घेऊन काम करत होते अशी टीका केली.

यशवंतभाऊ म्हणाले मतदार हा कुणाचा नसतो. जी सरकार मतदारांचे प्रश्न मार्गी लावते त्या सरकारला मतदार मतदान करत असतात. मात्र महायुती सरकार मध्ये श्रमिक आणि कष्टकरी मतदारांचे प्रश्न मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सोडवता आले नाही. त्यामुळे त्यांना लोकसभा निवडणुकीत अपयश आल्याचे यशवंतभाऊ भोसलेंनी नमूद केले.

Edited By : Siddharth Latkar

yashwantbhau bhosale criticizes devendra fadnavis on lok sabha election result of maharashtra
कट्टरपंथी वाद देशाला घातक, अमरावतीची शांतता अबाधित ठेवा : यशाेमती ठाकूर (पाहा व्हिडिओ)

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com