Explanation On Advance Security Liaisoning: Saamtv
देश विदेश

What is ASL Security: मोहन भागवतांना ASLचे 'सुरक्षाकवच', काय आहेत प्रोटोकॉल अन् नियम; वाचा A To Z माहिती

Gangappa Pujari

Mohan Bhagwat Got ASL Security: काही दिवसांपूर्वीच देशातील प्रमुख व्हिआयपी व्यक्तींच्या सुरक्षेमध्ये मोठा बदल करण्यात आला. यामध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख मोहन भागवत यांना एएसएल (ASL) सुरक्षा देण्यात आली. देशाच्या पंतप्रधानांना जी सुरक्षा देण्यात येते तीच सुरक्षा सरसंघचालक मोहन भागवत यांना देण्यात आली आहे. एएसएल सुरक्षा म्हणजे काय? झेड प्लस सुरक्षेपेक्षा ती कशी वेगळी आहे, भारतात किती प्रकारची सुरक्षा असते? जाणून घ्या सविस्तर

ASL सुरक्षा म्हणजे काय?

एएसएल सुरक्षा ही भारतातील सर्वात मजबूत सुरक्षा कवच म्हणून ओळखले जाते. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांसारख्या निवडक लोकांना ही सुरक्षा देण्यात येते. एडव्हान्स सिक्युरिटी लाइजन (एएसएल) अंतर्गत, आरएसएस प्रमुख मोहन भागवत जिथे जातील, तिथे सीआयएसएफची एक टीम आधीच जाईल. त्या स्थळासह सर्व व्यवस्थेचा आढावा घेतला जाईल. स्थानिक प्रशासनासोबत बैठक घेण्यात येईल, ज्यामध्ये आयबीची टीमही उपस्थित राहणार आहे. या बैठकीत त्यांच्या भेटीचे ठिकाण, स्टेज, आयोजक, प्रवेश, बाहेर पडणे अशा विविध मुद्यांवर चर्चा होईल. आधी सुरक्षेचा आढावा घेऊन ग्रीन सिग्नल मिळाल्यानंतरच सरसंघचालक त्या कार्यक्रमात जातील.

कशी असते ASL सुरक्षा?

एएसएल सुरक्षेमध्ये आणखीही अनेक प्रोटोकॉल समाविष्ट आहेत. ज्यानुसार मोहन भागवत यांना बुलेट प्रुफ कारमधूनच प्रवास कराव लागणार आहे. ही कार कम्युनिकेशन उपकरणे आणि इतर सुविधांनी सुसज्ज असेल. याशिवाय जर हेलिकॉप्टरने कुठेही प्रवास करायचा असेल तर विशेष हेलिकॉप्टरनेच प्रवास करावा लागेल. त्यांच्या कार्यक्रमाची रुपरेषाही ASL प्रोटोकॉल अंतर्गत केली जाईल. सीआयएसएफ व्यतिरिक्त जिल्हा प्रशासन, स्थानिक पोलीस आणि आरोग्य विभागाचे पथकही त्यांच्या ताफ्यात असतील. पंतप्रधानांचाही असाच प्रोटोकॉल आहे. ते कुठेही दौऱ्यावर गेले की, एसपीजीची एक आगाऊ टीम तिथे अगोदर जाऊन आढावा आणि सुरक्षेची काळजी घेते. त्यांनी मंजुरी दिल्यानंतरच दौरा निश्चित होतो.

दौऱ्याआधी घेतला जातो आढावा!

नियोजित दौऱ्यापूर्वी राज्य पोलीस आणि प्रशासनासोबत बैठक घेऊन कोणती भूमिका निभावायची? धोका काय आहे? आणि त्याला सामोरे जाण्यासाठी काय व्यवस्था आहे आणि कोणती जबाबदारी कोण सांभाळणार हे ठरवण्याची जबाबदारी ASL टीमची आहे. या बैठकीत इंटेलिजन्स ब्युरोही सहयोगी आहे. ते म्हणतात की एएसएल मीटिंगमध्ये फक्त असिस्टंट कमांडंट किंवा सीआयएसएफचे अधिकारी सहभागी होतात.

फक्त आठ जणांकडे आहे ASL सुरक्षा

सध्या पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा, माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग, काँग्रेस नेत्या सोनिया गांधी, राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांना ASL संरक्षण मिळाले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी एसपीजीच्या एएसएल संरक्षणाखाली आहेत. तर बाकीच्यांना सीआरपीएफ कडून एएसएल संरक्षण मिळाले आहे. आरएसएस प्रमुख मोहन भागवत हे सीआयएसएफ (CISF) कडून एएसएल सुरक्षा मिळवणारे पहिले व्यक्ती असतील.

Z+ सुरक्षा मध्ये काय होते?

संघप्रमुख मोहन भागवत यांना आतापर्यंत Z+ सुरक्षा मिळाली आहे. भारतात एकूण 6 श्रेणी सुरक्षा उपलब्ध आहेत. SPG, Z+, Z सुरक्षा, Y सुरक्षा, Y+ सुरक्षा आणि X सुरक्षा. Z+ संरक्षण श्रेणी ही SPG कव्हर नंतर दुसऱ्या क्रमांकाची सर्वोच्च पातळी आहे. या सुरक्षा व्यवस्थेत 55 जवानांसह CRPF कमांडो असतात, जे 24 तास सतत सुरक्षा देतात.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Badlapur Case : बदलापूर अत्यार प्रकरणी मोठी अपडेट; एसआयटीकडून कोर्टात २ चार्जशीट दाखल, पाहा व्हिडिओ

Bharat Gogavale: महामंडळावर बोळवण, मंत्रिपदाची हुलकावणी; भरत गोगावले एसटीचं अध्यक्षपद स्वीकारणार?

NPS Vatsalya Scheme: तुमच्या मुलांनाही मिळणार पेन्शन! महिन्याला गुंतवा हजार, मुलं होतील कोट्याधीश; जाणून घ्या काय आहे योजना

UPI स्कॅम कसा ओळखायचा? तुमचे पैसे सुरक्षित करण्यासाठी या टिप्स करा फॉलो

Mhada Lottery 2024: म्हाडा लॉटरी घरांसाठी शेवटच्या दिवशी 'पेमेंट फेल'चा फटका! घराचे स्वप्न पूर्ण होणार का? शेकडो अर्जदार चिंतेत

SCROLL FOR NEXT