Mohan Bhagwat : मोठी बातमी! मोहन भागवत यांना PM मोदींच्या दर्जाची सुरक्षा; केंद्रीय गृहमंत्रालयाचा निर्णय

Mohan Bhagwat Security : मोहन भागवत यांना आता पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या इतकीच सुरक्षा पुरवण्यात आली आहे.
Mohan Bhagwat | भारत-पाक फाळणीबद्दल मोहन भागवतांचे हे विधान पाहा !
Mohan Bhagwat | भारत-पाक फाळणीबद्दल मोहन भागवतांचे हे विधान पाहा !Saam TV
Published On

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. मोहन भागवत यांना आता पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या इतकीच सुरक्षा पुरवण्यात आली आहे. केंद्रीय गृहमंत्रालयाने हा निर्णय घेतलाय. त्यांची अचानक सुरक्षा का वाढवण्यात आली? याबद्दल सवाल उपस्थित केले जात आहे.

Mohan Bhagwat | भारत-पाक फाळणीबद्दल मोहन भागवतांचे हे विधान पाहा !
Maratha Reservation : देवेंद्र फडणवीसांना उगाच टार्गेट करू नका; अपक्ष आमदाराची मनोज जरांगेंना विनंती

केंद्रीय गृहमंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, डॉ. मोहन भागवत (Mohan Bhagwat) यांना आधी झेड प्लस दर्जाची सुरक्षा होती. त्यात वाढ करून ASL म्हणजेच एडवांस सेक्युरिटी लायझनिंग सुरक्षा पुरवण्यात आली आहे. ही सुरक्षा फक्त पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनाच देण्यात येते.

विशेष बाब म्हणजे, काही दिवसांपूर्वी केंद्राने शरद पवार यांची देखील सुरक्षा वाढवली होती. त्यामुळे केंद्र सरकार अचानक सुरक्षा (Security) वाढवण्याचा का निर्णय घेतंय? असा प्रश्न अनेकांना पडलाय. मोहन भागवत यांना कोणाची भीती आहे. त्यांना पंतप्रधान आणि गृहमंत्री यांच्याइतकी सुरक्षा देण्याचं कारण काय? असा सवालही अनेकजण उपस्थित करीत आहेत.

सूत्रांच्या माहितीनुसार, केंद्रीय गृहमंत्रालयाने मोहन भागवत यांच्या सध्याच्या सुरक्षेची समीक्षा केली. त्यानंतरच हा निर्णय घेण्यात आला. मोहन भागवत काही मुस्लिम संघटनांच्या निशाणावर असल्याचं बोललं जातंय. त्यामुळे डॉक्टर मोहन भागवत यांच्या राहण्याच्या व्यवस्थेबाबत, प्रवास, भेटी आणि बैठकांच्या स्थळी अतिशय कडक सुरक्षा प्रोटोकॉल पाळण्यात येतील.

त्याचबरोबर ASL अंतर्गत, संरक्षित व्यक्तीच्या संरक्षणाशी संबंधित जिल्हा प्रशासन, पोलीस, आरोग्य आणि इतर विभाग यासारख्या स्थानिक संस्थांचा सहभाग अनिवार्य आहे. त्यात बहुस्तरीय सुरक्षा गराड्याचा समावेश असल्याचे सूत्रांनी सांगितले. हेलिकॉप्टर प्रवासाला केवळ खास डिझाइन केलेल्या हेलिकॉप्टरमध्येच परवानगी दिली जाईल.

Mohan Bhagwat | भारत-पाक फाळणीबद्दल मोहन भागवतांचे हे विधान पाहा !
Amravati News : ब्लॅकमेलर, ढोंगी नाटक करणारा, मला पाडण्यासाठी सुपारी घेतली; नवनीत राणांची बच्चू कडूंवर सडकून टीका

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com