Maharashtra Politics: विधानसभेला किती जागांवर लढणार, अजितदादांनी सांगितला प्लॅन, 6 आमदार संपर्कात असल्याचाही दावा

Ajit Pawar News : शिवसेना (शिंदे गट) यांच्या नेत्यांकडून अजित पवारांच्या राष्ट्रवादीवर टीकेचे बाण सोडले जात आहेत. महायुतीमध्ये सर्व काही अलबेल आहे का? असा सवाल विचारला जात आहे.
Ajit Pawar
Ajit Pawar
Published On

Maharashtra Assembly Election 2024 : राष्ट्रवादी काँग्रस आणि शिवसेना यांच्यामध्ये आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झाडल्या जात आहेत. शिवसेना (शिंदे गट) यांच्या नेत्यांकडून अजित पवारांच्या राष्ट्रवादीवर टीकेचे बाण सोडले जात आहेत. महायुतीमध्ये सर्व काही अलबेल आहे का? असा सवाल विचारला जात आहे. आशातच अजित पवार यांनी आगामी विधानसभा निवडणुकीचा आपला प्लॅन सांगितलाय. आगामी विधानसभेला ६० जागा लढण्याचा विचार करत आहे. रस्सीखेच करुन जागा मिळवल्यास महायुतीला मोठा फटका बसू शकतो, असे शनिवारी अजित पवार यांनी सांगितले.

मंत्री छगन भुजबळ यांनी 90 जागांवर दावा केला होता, आशातच आता अजित पवार यांनी स्व:त 60 जागा सांगितल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस महायुतीमध्ये पिछाडीवर गेली आहे का? असा सवाल उपस्थित होत आहे. अजित पवार यांनी लोकसभा निवडणुकीआधी भाजपसोबत घरोबा करत सत्तेत सामील झाले होते. पण लोकसभेला भाजपला तितका फायदा झाला नाही. त्यामुळे अजित पवार यांना महायुतीमध्ये घेण्याचा निर्णय चुकल्याचे स्पष्टपणे संघाकडूनही सांगण्यात आले होते. त्याशिवाय भाजपमध्ये अंतर्गत तशा चर्चाही सुरु आहेत. शिंदे गटाकडून तर जाहीर नाराजीच व्यक्त कऱण्यात येत आहे. आशातच आता दादांनी एक पाऊल मागे जात ६० जागा लढणार असल्याचे संकेत दिले आहेत. इतकेच काय तर आपल्या संपर्कात सहा आमदार असल्याचेही त्यांनी सांगितले आहे. तीन काँग्रेस आणि तीन अपक्ष आमदार संपर्कात असल्याचे अजित पवार यांनी सांगितले.

Ajit Pawar
Special Report : महायुतीत अजित पवार नकोसे? महायुतीतले दादा विलन? Maharashtra Politics | Marathi News

नागपूरमधील एक रॅलीला संबोधित करताना अजित पवार यांनी आपला आगामी विधानसभा निवडणुकीचा प्लॅन सांगितला. ते म्हणाले की, "2019 च्या विधानसभा निवढणुीत 54 जागांवर विजय मिळवला होता. यावेळी आपल्यासोबत तीन अपक्ष आणि तीन काँग्रेसचे आमदार सोबत आहेत. त्यामुळे आम्ही जवळपास 60 जागांची मागणी करणार आहे. " दरम्यान, अजित पवार यांनी पहिल्यांदाच विधानसभा जागांविषयी खुलेआम वक्तव्य केले आहे

काँग्रेस आणि अपक्ष आमदार आमच्यासोबत

विधानसभेला मतदान करणारे काँग्रेसचे तीन आमदार लवकरच राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सामील होणार आहेत. त्याशिवाय तीन अपक्ष आमदारही आमच्या संपर्कात आहेत. त्यामुळे ६ जागा आम्हाला अतिरिक्त मिळतील. आमची एकूण संध्या ६० इतकी होईल. विधानसभा निवढणुकीत आम्हाला ६० जागा मिळायला हव्यात, असे अजित पवार म्हणाले.

Ajit Pawar
Maharashtra Politics : 'विधानसभेत कॉंग्रेसचे आमदार आपल्यासोबत', अजित पवार नेमकं काय म्हणाले, पाहा VIDEO

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com