Maharashtra Politics : 'विधानसभेत कॉंग्रेसचे आमदार आपल्यासोबत', अजित पवार नेमकं काय म्हणाले, पाहा VIDEO
मुंबई : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना उधाण आलंय. दरम्यान अजित पवार यांनी राष्ट्रवादीच्या जागांबाबत मोठं वक्तव्य केलंय. कॉंग्रेसचे काही आमदार आपल्यासोबत अजित पवार यांनी म्हटलंय. त्यामुळे विधासभेसाठी ६० जागांच्या तयारीला लागा, असे आदेश अजित पवार यांनी पदाधिकाऱ्यांना दिले आहेत. राष्ट्रवादीच्या ५६ आमदारांच्या जागा आहे, तशाच राहतील. त्यामध्ये आणखी काही जागांची भर पडणार असून विधानसभेला ६० जागांची तयारी करावी लागणार, असं विधान अजित पवार यांनी केलंय.
दोन महिने सगळी कामं बाजूला ठेवून तयारीला लागा, असे निर्देश अजित पवार यांनी पदाधिकाऱ्यांना दिले आहेत. आता अजित पवार यांच्या या विधानाने राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. 'विधानसभेत कॉंग्रेसचे काही आमदार आपल्या सोबत' असं अजित पवार म्हणाले आहेत, त्यामुळे आता हे आमदार नेमके कोणते, याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.