Manasvi Choudhary
गावरान स्टाईल अंडा करी चवीला भारीच लागते. अनेकजण हॉटेलमध्ये गेल्यानंतर अंडा करी ऑर्डर करतात.
आज आम्ही तुम्हाला घरच्या घरी सोप्या पद्धतीने गावरान स्टाईल अंडा करी कशी बनवायची ही रेसिपी सांगणार आहोत.
गावरान स्टाईल अंडा करी बनवण्यासाठी अंडी, कांदा, सुके खोबरे, आले- लसूण पेस्ट, कोथिंबीर, मसाले, तेल आणि मीठ हे साहित्य एकत्र करा.
सर्वात आधी अंडा करी बनवण्यासाठी वाटण तयार करा यासाठी गॅसवर तव्यावर गरम तेलामध्ये बारीक चिरलेला कांदा भाजून घ्या. नंतर यात सुके खोबरे मिक्स करा.
आता भाजलेला कांदा, खोबरे, लसूण पाकळ्या, आलं आणि थोडी कोथिंबीर हे सर्व एकत्र करून मिक्सरला थोडं पाणी घालून बारीक वाटून घ्या.
अंडी उकडून घ्या त्याचे चार भाग करा कढईमध्ये तेल हळद आणि थोडा मसाला घालून अंडी परतून घ्या.
एका कढईमध्ये गरम तेलामध्ये तयार वाटण चांगले परतून घ्या नंतर यात मसाला, हळद आणि धनापावडर हे चांगले परतून घ्या.
मिश्रणात थोडेपाणी मिक्स करून चांगले उकळून घ्या नंतर त्यात फ्राय केलेली अंडी मिक्स करा. आणि चवीनुसार मीठ घाला.