Congrss Leader Arrested Saam Tv
देश विदेश

Political News: मोठी बातमी! काँग्रेसच्या बड्या नेत्याला अटक, राजकीय वर्तुळात खळबळ

West Bengal Politics: पश्चिम बंगालमधील नंदिग्राम पोटनिवडणुकीदरम्यान मोठी घडामोड घडली. काँग्रेस उमेदवाराला अटक करण्यात आली.

Priya More
  • पश्चिम बंगालमध्ये राजकीय वातावरण तापले

  • नंदिग्राम पोटनिवडणुकीतील काँग्रेस उमेदवार मिलन प्रधान अटकेत

  • ममता बॅनर्जींनी पाठिंबा दिल्यानंतर काँग्रेस उमेदवाराला अटक

  • जुन्या प्रकरणात मिलन प्रधान यांना पश्चिम बंगाल पोलिसांकडून अटक

पश्चिम बंगालमध्ये मोठी राजकीय घडामोड घडली. नंदिग्राम पोटनिवडणुकीत एकापाठोपाठ एक नाट्यमय घडामोडी घडत आहेत. ममता बॅनर्जी यांच्या पक्षाच्या उमेदवाराने निवडणुकीतून माघार घेतली. ममता बॅनर्जी यांच्या टीएमसी पक्षाने काँग्रेस उमेदवाराला पाठिंबा दिला. त्यानंतर काँग्रेसच्या उमेदवाराला पश्चिम बंगाल पोलिसांकडून अटक करण्यात आली. मिलन प्रधान असं काँग्रेसच्या उमेदवाराचे नाव आहे. या अटकेमुळे पश्चिम बंगालच्या राजकारणात खळबळ उडाली आहे.

मिलन प्रधान हे काँग्रेसच्या तिकिटावर नंदिग्राम मतदारसंघातून निवडणूक लढवत होते. ममता बॅनर्जी यांनी काँग्रेसच्या उमेदवाराला पाठिंबा दिल्यानंतर लगेचच ही कारवाई करण्यात आल्याचा काँग्रेसचा आरोप आहे. मिलन प्रधान यांना अजामीनपात्र आरोपांखाली अटक करण्यात आली. पश्चिम बंगाल पोलिसांनी ही कारवाई केल्यानंतर फक्त राज्यभर नाही तर देशभर चर्चा होऊ लागली आहे. या घटनेमुळे पश्चिम बंगालमधील राजकीय वातावरण तापले आहे.

काँग्रेस पक्षाने नंदिग्राम पोटनिवडणुकीत मिलन प्रधान यांना आपला उमेदवार म्हणून घोषणा केली होती. पण शुक्रवारी नाट्यमय घडामोडीनंतर मिलन प्रधान यांना अटक करण्यात आली. काँग्रेसचा दावा आहे की, मिलन प्रधान यांच्यावरील ही कारवाई २००७ मध्ये भूसंपादनाविरोधात झालेल्या आंदोलनातील त्यांच्या सहभागामुळे करण्यात आली आहे. काँग्रेसचे आणखी एक नेते सुभाषीश भट्टाचार्य यांनाही अटक करण्यात आली. ते प्रधान यांच्या अटकेचा निषेध करत होते.

नंदिग्राम जमीन आंदोलनाप्रकरणी मिलन प्रधान यांच्यावर १२ पेक्षा अधिक गुन्हे दाखल आहेत. एका काँग्रेस नेत्याने दिलेल्या माहितीनुसार, त्यांना पूर्व मेदिनीपूर जिल्ह्यातील चांदीपूर येथील एका हॉटेलमधून अटक करण्यात आली. हा भाजपचा एक घाणेरडा डाव आहे. मिलन २००७ पासून नंदिग्राम जमीन आंदोलनात सक्रिय आहेत. त्यांच्यावर १२ हून अधिक गुन्हे दाखल आहेत. आजपर्यंत कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही. पण आज त्यांनी यशस्वीपणे उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर पोलिसांनी त्यांना अटक केली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

भाजपचे माजी आमदारावर सामूहिक बलात्काराचा गुन्हा; पीडितेच्या जीवाला धोका असल्याचा दावा

Kalya Miriche Fayade: काळी मिरीची चिमूटभर पूड 'या' ६ पदार्थांसोबत खा, चमत्कार पाहून व्हाल थक्क

Maharashtra News Live Update: साखर साठ्यासंदर्भात सरकारचा मोठा निर्णय, साखरेच्या किमती लवकरच कमी होणार

अग्निवीर सैनिकांनीसाठी 4 वर्ष पूर्ण होण्याच आत मिळणार नोकरी; कुठे मिळणार संधी?

West Bengal Politics: ममता बॅनर्जींना २४ तासांत दुसरा धक्का! उमेदवारानं ऐनवेळी निवडणुकीतून घेतली माघार

SCROLL FOR NEXT