DIY Floor Cleaning Tool: वाकून फरशी पुसताना कंबर दुखतेय? मग वापरा हा २ मिनिटांत तयार होणारा मॉप, उभ्यानेच होईल सफाई

DIY Floor Cleaning Tool: पाठदुखी किंवा गुडघेदुखीमुळे फरशी पुसणे कठीण जातेय? जुन्या सुती टी-शर्ट आणि फ्लोअर वायपरच्या मदतीने घरच्या घरी मॉप तयार करा आणि साफसफाई सोपी करा.
DIY Floor Cleaning Tool
DIY Floor Cleaning ToolSaam Tv
Published On: 

घराची साफसफाई करताना फरशी पुसणे हे रोजचे काम असते. पण सतत वाकून फरशी पुसल्यामुळे पाठ आणि गुडघे दुखू शकतात. ज्यांना आधीपासूनच पाठदुखी किंवा गुडघेदुखीचा त्रास आहे, त्यांच्यासाठी हे काम आणखी कठीण होते. अशा वेळी महागडा मॉप विकत घेण्याची गरज नाही. घरात असलेल्या जुन्या टी-शर्टपासून तुम्ही सहज मॉप तयार करू शकता. सोशल मीडियावरही सध्या ही ट्रिक चर्चेत आहे.

जुन्या टी-शर्टपासून मॉप कसा बनवायचा?

यासाठी तुम्हाला एक जुना सुती टी-शर्ट, कात्री आणि लांब दांडा असलेला फ्लोअर वायपर लागेल. सर्वप्रथम टी-शर्टच्या चार घड्या घाला. त्यानंतर कात्रीने कापडाच्या एका बाजूला छोटासा कापा. आता हे कापड फ्लोअर वायपरवर व्यवस्थित बसवा. अशा प्रकारे तुमचा घरगुती मॉप तयार होईल. या मॉपने तुम्ही खाली न वाकता उभे राहून फरशी पुसू शकता. त्यामुळे वारंवार वाकण्याची गरज पडणार नाही.

टी-शर्टऐवजी हे कापड वापरा

जुना टी-शर्ट नसेल तर तुम्ही सुती टॉवेल किंवा घरातील दुसरे सुती कापड वापरू शकता. सुती कापड पाणी चांगले शोषून घेते. त्यामुळे फरशी स्वच्छ करण्यास मदत होते. याशिवाय मायक्रोफायबर कापडाचाही वापर करू शकता. फक्त कापड वायपरला घट्ट बसले आहे याची काळजी घ्या.

फरशी पुसताना या गोष्टी लक्षात ठेवा

फरशी पुसताना शक्यतो सरळ उभे राहा. वारंवार वाकणे टाळा. एकाच स्थितीत जास्त वेळ काम करू नका. मॉप खूप ओला ठेवू नका. कारण जास्त ओल्या मॉपने फरशी पुसताना अधिक जोर लावावा लागू शकतो. काम करताना मध्येच थोडी विश्रांती घ्या. तुम्हाला सतत पाठदुखी किंवा गुडघेदुखीचा त्रास होत असेल, तर जबरदस्तीने काम करू नका. गरज पडल्यास घरातील इतरांची मदत घ्या किंवा डॉक्टरांचा सल्ला घ्या. जुन्या टी-शर्टपासून तयार केलेला हा मॉप फरशी पुसण्याचे काम सोपे करू शकतो.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.