विधानसभा निवडणुकीपूर्वी पंजाबमध्ये काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. काँग्रेस पक्षाच्या जाहीरनामा समितीचे सहअध्यक्ष हरदयाल सिंह कंबोज यांनी रामराम ठोकलाय. त्यांनी आज भाजपमध्ये प्रवेश केला आहे. हरियानाचे मुख्यमंत्री नायब सिंह सैनी, भाजपचे पंजाब प्रभारी सतीश पूनिया आणि पंजाब भाजपचे अध्यक्ष केवल सिंह ढिल्लों यांच्या उपस्थितीत भाजप कार्यालयात हरदयाल सिंह कंबोज यांनी भाजपचे सदस्यत्व स्वीकारले.
पंजाबमधील काँग्रेस जाहीरनामा समितीचे सह-अध्यक्ष हरदयाल सिंग कंबोज यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. हरियाणाचे मुख्यमंत्री आणि भाजप पंजाबचे प्रभारी सतीश पुनिया यांनी त्यांना पक्षाचे सदस्यत्व दिले.
काँग्रेसला मोठा धक्का
हरदयाल सिंग कंबोज यांनी काँग्रेसच्या तिकिटावर राजपुरा मतदारसंघ दोनदा जिंकला होता. कंबोज हे पंजाब जाहीरनामा समितीचे सह-अध्यक्ष होते. राजपुरामध्ये कंबोज यांचं वर्चस्व आहे. त्यांच्या भाजप प्रवेशाने काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. गुरुवारी, कंबोज अचानक सेक्टर ३७ येथील पंजाब भाजपच्या मुख्यालयात आले आणि त्यांनी पक्षाचे सदस्यत्व स्वीकारले. हरियाणाचे मुख्यमंत्री नायब सिंग सैनी यांनी कंबोज यांच्या भाजप प्रवेशासाठी प्रयत्न केले.
माजी आमदार काय म्हणाले?
हरदयाल सिंग यांच्या भाजप प्रवेशानंतर पंजाब भाजपचे अध्यक्ष केवल सिंग ढिल्लन आणि भाजप प्रभारी सतीश पुनिया यांनी त्यांचे स्वागत केले. भाजप प्रवेशाबाबत हरदयाल सिंग म्हणाले की, आज पंजाबला वाचवण्याची गरज आहे. केंद्र सरकारच्या एनडीएच्या पाठिंब्याशिवाय पंजाबमध्ये काहीही योग्य होऊ शकत नाही.
पंजाबमधील सध्याची परिस्थिती आम आदमी पक्षाने निर्माण केली आहे आणि ती हाताळण्यासाठी एनडीएसारख्या दूरदृष्टीची गरज आहे, असे ते म्हणाले. फक्त भाजपच पंजाबला वाचवू शकते आणि मी त्यावर गंभीरपणे विचार करून मग पक्षात सामील होण्याचा निर्णय घेतल्याचे कंबोज यांनी सांगितले.
मी माझ्या कारकिर्दीची सुरुवात विद्यार्थी राजकारणातून केली आणि लहान वयातच लोकसभा निवडणूक लढवली. मी राजकारण जवळून पाहिले आहे आणि अनेक महत्त्वाच्या जबाबदाऱ्या सांभाळल्या आहेत. हे सर्व पाहून भाजपात सामील होण्याचा निर्णय घेतला, कारण तरच आपण पंजाबला योग्य मार्गावर आणू शकतो, असे कंबोज म्हणाले.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.