WEST BENGAL POLICE RESHUFFLE saam tv
देश विदेश

पोलिस विभागात मोठे खांदेपालट! 23 IPS अधिकाऱ्यांच्या बदल्या; मुख्यमंत्र्यांचं गृह विभागात ऑपरेशन

West Bengal government transfers 23 IPS Officers: पश्चिम बंगाल पोलिस विभागात मोठा प्रशासकीय फेरबदल करण्यात आला आहे. राज्य पोलिस आणि कोलकाता पोलिस दलातील तब्बल 23 IPS अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत.

Omkar Sonawane

पश्चिम बंगाल सरकारने पोलिस विभागात मोठी प्रशासकीय खांदेपालट केली आहे. राज्य पोलिस आणि कोलकाता पोलिस दलातील तब्बल 23 IPS अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. यामध्ये अनेक वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांचाही समावेश आहे. गृह विभागाकडून यासंदर्भातील अधिसूचना जारी करण्यात आली आहे. या फेरबदलात कोलकाता पोलिसातील अनेक वरिष्ठ अधिकाऱ्यांना नव्या जबाबदाऱ्या देण्यात आल्या आहेत. तसेच राज्य पोलिस दलातील अधिकाऱ्यांचीही विविध महत्त्वाच्या पदांवर नियुक्ती करण्यात आली आहे.

कोलकाता पोलिसांचे अतिरिक्त पोलिस आयुक्त देवेंद्र प्रकाश सिंह यांची उत्तर बंगालमधील इंटेलिजन्स ब्रांचच्या (IB) महानिरीक्षकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. तर कोलकाता पोलिसांचे संयुक्त आयुक्त सूर्य प्रताप यादव यांना राज्य पोलिसांच्या IB मध्ये उपमहानिरीक्षक (DIG) म्हणून नियुक्त करण्यात आले आहे. कोलकाता पोलिसांच्या एनफोर्समेंट ब्रांचचे उपायुक्त स्पर्शा नीलांगी यांच्याकडे डिटेक्टिव्ह डिपार्टमेंटची (DD) नवी जबाबदारी सोपवण्यात आली आहे. तर पश्चिम बंगाल पोलिसांच्या स्पेशल टास्क फोर्सचे (STF) IG सुधीर कुमार नीलकंठम यांची कोलकाता पोलिसांच्या अतिरिक्त आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

राज्य पोलिसांच्या IB मध्ये DIG पदावर कार्यरत असलेले भोलानाथ पांडे यांची कोलकाता पोलिसांच्या संयुक्त आयुक्त (ट्रॅफिक) पदावर नियुक्ती करण्यात आली आहे. राज्य पोलिसांमध्ये DIG (सिक्युरिटी) म्हणून कार्यरत असलेले सुखेंदु हीरा यांना कोलकाता पोलिसांच्या संयुक्त आयुक्त (सिक्युरिटी) पदाची जबाबदारी देण्यात आली आहे. पश्चिम बंगाल पोलिस क्राइम रेकॉर्ड्स ब्युरोच्या (WBCRB) IG नीलू शेरपा यांची पश्चिम बंगाल पोलिस हाउसिंग अँड इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनच्या (WBPHIDCL) IG पदावर बदली करण्यात आली आहे. तर पश्चिम बंगाल पोलिस होमगार्डच्या माजी IG शंका शुभ्रा चक्रवर्ती यांची WBCRB च्या नव्या IG म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

WBPHIDCL चे माजी DIG देबर्षि दत्ता यांची विधाननगर पोलिस कमिश्नरेटच्या संयुक्त आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे. पश्चिम बंगाल सशस्त्र पोलिस दलाच्या 10व्या बटालियनचे कमांडिंग ऑफिसर नीमा नरबू भूटिया यांना पश्चिम बंगाल पोलिसांच्या गुन्हे अन्वेषण विभागात (CID) विशेष पोलिस अधीक्षक म्हणून नियुक्त करण्यात आले आहे. राज्य पोलिसांच्या इंटेलिजन्स ब्रांचचे माजी विशेष पोलिस अधीक्षक धृतिमान सरकार यांची मालदा जिल्ह्यात CID च्या विशेष पोलिस अधीक्षकपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

चार अधिकाऱ्यांनाही नवी जबाबदारी

पूर्णिमा शेरपा यांची कालिम्पोंगच्या अतिरिक्त पोलिस अधीक्षकपदी, तर अभिषेक रॉय यांची बीरभूमच्या अतिरिक्त पोलिस अधीक्षकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. मानवेंद्र दास यांना माथाभांगा येथील अतिरिक्त पोलिस अधीक्षकपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. तर कुणाल बरनाबास यांची मालदा ग्रामीणच्या अतिरिक्त पोलिस अधीक्षकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. हे चारही अधिकारी पश्चिम बंगाल पोलिस सेवा कॅडरमधील आहेत. या मोठ्या फेरबदलामुळे राज्य पोलिस आणि कोलकाता पोलिस दलातील अनेक महत्त्वाच्या पदांवर अधिकाऱ्यांची नव्याने नियुक्ती झाली आहे. अधिसूचनेनुसार, या सर्व अधिकाऱ्यांच्या नव्या जबाबदाऱ्या तत्काळ प्रभावाने लागू करण्यात आल्या आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

पवारांना काँग्रेसची साथ, ठाकरेसेना नाराज? शिंदेसेना-राष्ट्रवादीत समेट, शिंदेसेनेतच फाटफूट

IMD Alert: विजांचा कडकडाट अन् ढगांचा गडगडाट; महाराष्ट्रासह १० राज्यात बरसणार मुसळधार पाऊस, हवामान विभागाचा इशारा

Maharashtra News Live Update: गोपीचंद पडळकरांना,डोनाल्ड ट्रम्पही घाबरतात; चंद्रकांत पाटलांचा पडळकरांना मिश्किल टोला

बॉलीवूड अभिनेत्याला देश सोडून जायला सांगितलं; त्याने हायकोर्टात धाव घेतली|VIDEO

Car Neutral or First Gear: ट्रॅफिक सिग्नलवर कार न्यूट्रलमध्ये ठेवावी की गिअरमध्ये?

SCROLL FOR NEXT