सुट्टीच्या दिवशी पोलीस दलात मोठा भूकंप! 7 IPS, 39 अधिकाऱ्यांच्या बदल्यांनी खळबळ

Government Transfers 7 IPS Transfers : हरियाणा सरकारने रविवारी पोलीस प्रशासनात मोठा फेरबदल केला. 7 IPS आणि 39 HPS अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या असून राजेश कुमार यांच्याकडे पंचकुला एसपी पदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.
HARYANA POLICE RESHUFFLE: 7 IPS
HARYANA POLICE RESHUFFLE: 7 IPSsaam tv
Published On

हरियाणा सरकारने सुट्टीच्या दिवशी पोलीस प्रशासनात मोठा फेरबदल केला आहे. सरकारने 7 IPS आणि 39 HPS अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या आहेत. IPS राजेश कुमार यांच्या जबाबदारीत वाढ करण्यात आली असून त्यांच्याकडे पंचकुला एसपी पदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. यासोबतच ते एसटीएफ पंचकुलाचे एसपी आणि सोशल आऊटरीच कार्यक्रमाचे एसपी म्हणून काम पाहणार आहेत.

HARYANA POLICE RESHUFFLE: 7 IPS
बदल्यांचा धडाका सुरूच! 31 IPS अधिकाऱ्यांच्या बदल्या; पोलिस दलात मोठी खळबळ

दरम्यान अनेक जिल्ह्यांमध्ये पोलीस उपअधीक्षक स्तरावरही बदल करण्यात आले आहेत. मानेसरच्या DCP प्रबिना यांची नियुक्ती एसपी, GRP अंबाला छावणी म्हणून करण्यात आली आहे. तर फरीदाबादचे DCP क्राइम राजेश मोहन यांची बदली करून त्यांच्याकडे DCP सेंट्रल फरीदाबाद पदाची जबाबदारी देण्यात आली आहे. गुरुग्रामचे DCP ट्रॅफिक प्रतीक गहलोत यांच्याकडे DCP मानेसरपदाची अतिरिक्त जबाबदारी सोपवण्यात आली आहे. यासोबतच ते कमांडंट, चौथी बटालियन मानेसरपदाचाही अतिरिक्त कार्यभार सांभाळतील.

HARYANA POLICE RESHUFFLE: 7 IPS
10 IPS अधिकाऱ्यांच्या तडकाफडकी बदल्या; महत्वाच्या शहरातील पोलीस आयुक्त बदलले, कोणाची कुठे नियुक्ती?

सोनीपतचे DCP ईस्ट आयुष यादव यांची नियुक्ती DCP साऊथ गुरुग्राम म्हणून करण्यात आली आहे. फरीदाबादचे DCP ट्रॅफिक जयबीर सिंह यांना DCP क्राइम फरीदाबाद करण्यात आले आहे. तर सोनीपतचे DCP क्राइम नरेंद्र सिंह यांची नियुक्ती एसपी, स्टेट क्राइम ब्युरो मुख्यालय येथे करण्यात आली आहे. या फेरबदलामुळे हरियाणा पोलीस प्रशासनातील अनेक महत्त्वाच्या पदांवर नवीन अधिकाऱ्यांची नियुक्ती झाली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com