सिंघल यांच्यासह 5 IPS अधिकाऱ्यांच्या बदल्या; पोलिस दलात खळबळ, कोणाची कुठे नियुक्ती?

5 IPS Officers Transfer: दिल्ली पोलिस दलात मोठा फेरबदल करण्यात आला आहे. 5 IPS अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या असून चिन्मय बिस्वाल यांची पोलीस आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे. कोणाला कोणती जबाबदारी मिळाली, जाणून घ्या.
DELHI POLICE RESHUFFLE
DELHI POLICE RESHUFFLEsaam tv
Published On

दिल्ली पोलिस दलात मोठा फेर बदल करण्यात आला आहे. 5 IPS अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या असून, उपराज्यपालांनी पोलिस स्थापना मंडळाच्या शिफारशीनुसार या नियुक्त्यांना नवीन जबाबदारीसोबत अतिरिक्त कार्यभार सोपवण्यात आला आहे. या आदेशानुसार 2008 बॅचचे IPS अधिकारी चिन्मय बिस्वाल यांची पोलिस आयुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्याकडे संयुक्त CP/IFSO चा अतिरिक्त कार्यभारही सोपवण्यात आला आहे.

DELHI POLICE RESHUFFLE
बदल्यांचा धडाका सुरूच! 31 IPS अधिकाऱ्यांच्या बदल्या; पोलिस दलात मोठी खळबळ

2010 बॅचचे IPS अधिकारी इश सिंघल यांची अतिरिक्त पोलिस आयुक्त, आर्थिक गुन्हे शाखा म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. याच बॅचचे IPS अधिकारी दिनेश कुमार गुप्ता यांची अतिरिक्त पोलिस आयुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. तर 2013 बॅचचे IPS अधिकारी विकास कुमार यांची अतिरिक्त पोलिस आयुक्त, म्हणून नियुक्ती करण्यात आली असून, त्यांच्याकडे वाहतूक विभागाचा अतिरिक्त प्रभारही देण्यात आला आहे.

DELHI POLICE RESHUFFLE
IPS Officer Transfer: ३ आयपीएस अधिकाऱ्यांच्या तडकाफडक्या बदल्या, प्रशासकिय वर्तुळात खळबळ

2021 बॅचच्या IPS अधिकारी इशा सिंह यांची DCP/वेलफेअर पदावर नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्याकडे DCP/लीगल सेलचा अतिरिक्त प्रभारही सोपवण्यात आला आहे.

यापूर्वीही दिल्ली पोलिसांत मोठा फेरबदल

यापूर्वी मे महिन्यात दिल्ली पोलिस प्रशासनात मोठ्या प्रमाणावर फेरबदल करण्यात आला होता. त्यावेळी भारतीय पोलिस सेवेतील (IPS) 24 अधिकारी आणि दिल्ली, अंदमान आणि निकोबार द्वीपसमूह पोलिस सेवेतील 14 अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या होत्या.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com