नव्या वर्षात राज्यात थंडी जोर धरणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवलाय. तर येत्या चार दिवसांत थंडी जाणवणार असून विदर्भात कमाल तापमानात मात्र फारसा परिणाम जाणवणार नाही. भारतीय हवामानशास्त्र विभाग (IMD) नुसार ४ जानेवारीपासून उत्तर भारताला ताज्या वेस्टर्न डिस्टर्बन्सचा तडाखा बसणार आहे. यामुळे पाऊस आणि बर्फवृष्टी होणार असल्याची शक्यता आहे.
आयएमडीनुसार, वेस्टर्न डिस्टर्बन्स ४ जानेवारीच्या रात्रीपासून उत्तर-पश्चिम भारतावर परिणाम होणार आहे. १ ते ३ जानेवारी दरम्यान पश्चिम हिमालयीन भागात पाऊस आणि बर्फवृष्टी होण्याचा अंदाज आहे. हवामान खात्याने ४ आणि ५ जानेवारी रोजी मोठ्या प्रमाणात पाऊस आणि हिमवर्षाव होण्याची शक्यता वर्तवलीय. वेस्टर्न डिस्टर्बन्स उत्तर भारतीय क्षेत्रापासून दूर गेलाय. यामुळे थंडीची लाट कमी झालीय.
जी केवळ पश्चिम हिमालयीन भागात कायम असल्याचं आयएमडीचे शास्त्रज्ञ सोमा सेन रॉय यांनी सांगितलं. नवी दिल्लीत सोमवारी किमान तापमान १०.३ डिग्री सेल्सिअस नोंदवण्यात आलं. जे सामन्य तापमानापेक्षा ३.५ डिग्रीने अधिक आहे. दिल्लीत सकाळी ९वाजेपासून हवेची गुणवत्ता १७८ वर मध्यम श्रेणीत होती. समीर ॲप डेटानुसार, १० केंद्रांनी हवा गुणवत्ता निर्देशांक (AQI) खराब श्रेणीत नोंदवला, तर इतरांमध्ये तो मध्यम श्रेणीत राहिला. IMD ने बहुतेक ठिकाणी धुके आणि दाट धुके आणि काही ठिकाणी सकाळी दाट धुके राहण्याचा अंदाज वर्तवलाय.
नंतर आकाश निरभ्र राहण्याची शक्यता आहे. तर संध्याकाळी आणि रात्री धुके किंवा हलके धुके पडण्याची शक्यता आहे. कमाल तापमान १८ अंश सेल्सिअस आणि किमान तापमान ९ अंश सेल्सिअसच्या आसपास राहण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवलाय. काश्मीरच्या गुलमर्ग आणि पहलगाममध्ये थंडीच्या लाटेमुळे तीव्र थंडी कायम आहे.
तापमान गोठणबिंदूच्या काही अंशांच्या खाली गेले आहे. मात्र खोऱ्यातील इतर भागात थंडीपासून काहीसा दिलासा मिळालाय. उत्तर काश्मीरमधील स्कीइंगसाठी प्रसिद्ध असलेल्या गुलमर्ग या पर्यटन स्थळातील किमान तापमान उणे १० अंश सेल्सिअस नोंदवले गेले, जे आदल्या रात्रीच्या तुलनेत २ अंश कमी आहे. दक्षिण काश्मीरमध्ये वार्षिक अमरनाथ यात्रेसाठी आधार शिविर पहलगाममध्ये न्यूनतम तापमान शून्यपासून ९.२ डिग्री सेल्सिअसच्या खाली नोंदवलं गेलं. मागील रात्री हे तापमान ८.५ डिग्री सेल्सिअसच्या खाली होतं.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.