Unseasonal Rain : थंडी गायब, बेमोसमी पावसाचा तडाखा, विदर्भ-मराठवाड्यात आज पावसाचा अलर्ट

Unseasonal Rain in Maharashtra : शुक्रवारी राज्यात अवकाळी पावसाने जोरदार झोडपले. आजही राज्यात काही जिल्ह्यात मुसळधार ते अतिमुसळधार पवासाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. अवकाळी पावसामुळे शेतकरी संकटात आलाय.
unseasonal rain
unseasonal rain Saam Digital
Published On

Unseasonal weather in Maharashtra : ऐन हिवाळ्यामध्ये अवकाळी पावसाने तडाखा दिलाय. अवकाळी पाऊस आणि गारपीटीने पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेय. शुक्रवारी रात्री राज्यात अनेक ठिकाणी अवकाळी पावसाने हजेरी लावली. जळगाव, धुळे, परभणी, नागपूर, नवी मुंबई, नाशिकसह राज्यातील अनेक जिल्ह्यात हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाने हजेरी लावली. वादळी वाऱ्यामुळे शेतकऱ्यांना मोठा फटका बसलाय. पिकांचे मोठं नुकसान झालेय. आजही राज्यात अनेक ठिकाणी अवकाळी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. वादळी वारा आणि विजांच्या कडकडाटासह मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलाय. अचानक जोरदार पाऊसाला सुरुवात झाल्याने काही प्रमाणात जनजीवन विस्कळीत झाले.

सध्या बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले असून, पश्चिमी विक्षोभाच्या प्रभावामुळे अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरातून येणाऱ्या बाष्पयुक्त वाऱ्यांचा संगम मध्य भारतावर होत आहे. यामुळे विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात मेघगर्जनेसह वादळी वाऱ्याचा पाऊस आणि काही भागांमध्ये गारपीट होण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांना खबरदारी घेण्याचे आवाहन पावसाचा व गारपीटीचा फटका पिकांवर होण्याची शक्यता लक्षात घेता, शेतकऱ्यांनी ओलीत करणे तातडीने थांबवावे, तसेच गारपीट झाल्यानंतर पिकांवर कीड व रोगांचा प्रादुर्भाव होऊ शकतो. त्यामुळे तज्ञांचा सल्ला घेऊन आवश्यक उपाययोजना करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

unseasonal rain
Unseasonal Rain : अवकाळी पावसाने कांद्याचे नुकसान; टोमॅटो उत्पादक शेतकरीही अडचणीत

धुळ्यात वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस -

धुळ्यामध्ये शुक्रवारी वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाने हजेरी लावली. साक्री तालुक्यातील पिंपळनेर परिसरामध्ये अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली आहे, हवामान विभागातर्फे वर्तवण्यात आलेल्या अंदाजानुसार साक्री तालुक्यातील बहुतांश ठिकाणी अवकाळी पावसाला सुरुवात झाली आहे, हवामान विभागातर्फे धुळे जिल्ह्यामध्ये जोरदार अवकाळी पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली होती, आणि यानुसारच आज दुपारच्या सुमारास अचानक जोरदार पावसाने हजेरी लावल्याने नागरिकांची एकच तारांबळ उडाली आहे. या अवकाळी पावसामुळे रब्बी हंगामातील पिकांना मोठ्या प्रमाणात नुकसान पोहोचण्याची देखील भीती व्यक्त केली जात असून, या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होण्याची चिन्ह आहेत.

unseasonal rain
Maharashtra Unseasonal Rain: राज्यात वादळी वाऱ्यासह पावसाचं थैमान, रस्त्यावर झाडे पडली...पिकांसह घरांचे नुकसान; वीज पडून ३ शेतकऱ्यांचा मृत्यू

भुसावळ तालुक्यातील वरणगाव परिसरात अवकाळी पावसाची जोरदार हजेरी

भुसावळ तालुक्यातील वरणगाव परिसरामध्ये अवकाळी पावसाने ढगांच्या गडगडात जोरदार हजेरी लावली आहे गेल्या चार दिवसापासून हवामानामध्ये बदल झाला होता थंडीचे दिवस असताना सुद्धा उकाडा जाणवत होता अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली त्यामुळे बळीराजा आर्थिक संकटात सापडणार आहे.

उल्हासनगर आणि अंबरनाथ परिसरात अवकाळी पाऊस

उल्हासनगर आणि अंबरनाथ परिसरात मध्यरात्रीच्या सुमारास अवकाळी पावसाने हजेरी लावली. गेल्या दोन ते तीन दिवसांपासून ढगाळ वातावरण पाहायला मिळालं. त्यानंतर रात्रीच्या सुमारास ढग अवकाळी पावसाच्या सरी कोसळल्या.या भागातील जरा दोन दिवसांपासून उष्मा वाढला होता. तसच रात्री पडलेल्या पावसामुळे हवेत गारवा निर्माण झालाय. अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांची तारांबळ उडाली.

अवकाळीमुळे भाजीपाला पिकाचं नुकसान होण्याची भीती

बदलापूर आणि वांगणी परिसरात मध्यरात्रीच्या सुमारास अवकाळी पावसाने हजेरी लावली. गेल्या दोन ते तीन दिवसांपासून या भागातील थंडी गायब झाली असून वातावरणात उष्मा वाढला होता. तसच ढगाळ वातावरण पाहायला मिळालं. त्यानंतर शुक्रवारी रात्रीच्या सुमारास ढग दाटून आले आणि पावसाच्या सरी कोसळल्या. या पावसामुळे हवेत गारवा निर्माण झालाय. मात्र बदलापूरच्या ग्रामीण भागातील शेतकऱ्यांची चिंता वाढलीय. या भागात हंगामी टोमॅटो, वांगी, वाल, हरभरा पिकवला जातो. आणखी दोन दिवस ढगाळ वातावरण आणि असाच पाऊस राहिला तर टोमॅटो, वांगी तसेच इतर पिकांना फटका बसू शकतो.

जळगाव जिल्ह्यात अवकाळी आजही येलो अलर्ट

जळगाव ऐन हिवाळ्यात जळगाव जिल्ह्यात जोरदार पावसाने हजेरी लावली. जिल्ह्यातील रावेर, भुसावळ, यावल व जळगाव तालुक्यातील काही भागांमध्ये सोसाट्याच्या वाऱ्यासह जोरदार पावसाने हजेरी लावली. अवकाळी पावसामुळे हरभरा, तूर व फरदड कापसाचे नुकसान होनार तर कोरडवाहू जमिनीवरील पिकांना मात्र फायदा होणार आहे.

हवामान विभागाकडून जिल्ह्यात अवकाळी पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला होता. त्यात काही दिवसांपासून जिल्ह्यात ढगाळ वातावरण निर्माण झाले होते. त्यामुळे किमान तापमानात वाढ होऊन, थंडीही कमी झाली होती.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com