Weather Update: थंडीचा कडाका वाढणार? पुढील काही दिवसांत महाराष्ट्रातील वातावरण कसं असेल? वाचा सविस्तर

Weather Update India: नवीन वर्षाच्या संदर्भात हवामान खात्यानं सावधानतेचा इशारा दिला आहे. ३० डिसेंबरपासून उत्तर पश्चिम भारतात थंडीची लाट येणार असल्याचं हवामान खात्यानं म्हटलंय.
Winter Weather Update
Winter Weather UpdateSaam Tv News
Published On

नवी दिल्ली : राष्ट्रीय राजधानी दिल्लीसह संपूर्ण भारतात थंडीची चादर पसरली आहे. नवीन वर्षेच्या संदर्भात हवामान खात्यानं सावधानतेचा इशारा दिला आहे. ३० डिसेंबरपासून उत्तर पश्चिम भारतात थंडीची लाट येणार असल्याचं हवामान खात्यानं म्हटलंय. म्हणजेच नववर्षाच्या मुहूर्तावर थंडी वाढणार आहे. तसेच पुढील दोन - तीन दिवस भारतात दाट धुक्याची चादर पसरणार आहे.

येत्या पाच दिवसांमध्ये यूपीमध्ये किमान सहा अंश सेल्सिअसची घसरण होईल. त्याच बरोबर हरियाणा, चंदीगड, पंजाब, राजस्थान आदी राज्यांमध्ये थंडीच्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे. गेल्या २४ तासात पंजाब, हरियाणा, राजस्थान, उत्तर प्रदेशमध्ये दाट धुक्यांची चादर पसरलेली होती. तर उत्तराखंडमध्ये जोरदार पाऊस पडला होता. हवामान खात्याच्या म्हणण्यांनुसार, ६ जानेवारीपासून उत्तर- पश्चिम भारताचे हवामान बदलेल. अशी माहिती त्यांनी दिलीय.

Winter Weather Update
Weather Report: उत्तर भारतात थंडीची लाट, १६ राज्यांमध्ये दाट धुक्याचा इशारा

तर जम्मू- काश्मीर आणि लडाखमध्ये किमान तापमान शून्य अंशाच्या खाली आला आहे. तर उत्तर पश्चिम भारतातील उर्वरीत राज्यांमध्ये ६-१२ अंश सेल्सिअस राहील. तर, राजस्थानच्या सीकर जिल्ह्यात ५.७ अंश सेल्सिअस नोंदवण्यात आला आहे. तर उत्तर प्रदेश, पूर्व मध्य प्रदेश आणि छत्तीसगडमध्ये किमान तापमानात १ ते ३ सेल्सिअची घट नोंदवण्यात आली आहे. त्याचवेळी हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, हरियाणा, चंदीगड, दिल्ली आणि पश्चिम राजस्थानमध्ये ३ ते ६ अंश सेल्सिअसने कमी झाले आहे. बिहार, झारखंड, उत्तर प्रदेश, मध्य महाराष्ट्र, विदर्भ, पश्चिम मध्य प्रदेशात किमान तापमान सरासरीपेक्षा जास्त आहे.

Winter Weather Update
Mumbai Weather: मुंबईची हवा विषारीच, राज्यातील २२ शहरे प्रदूषित, धुरक्याचे साम्राज्य

येत्या पाच दिवसात मध्य भारतातील तापमानात ३ ते ५ अंश सेल्सिअसने घट होणार आहे. तर ३१ डिसेंबर ते २ जानेवारी या कालावधीत हरियाणा, चंदीगड आणि पंजाबमध्ये थंडीची लाट येणार आहे. तसेच राजस्थानमध्ये ३० डिसेंबर ते २ जानेवारी दरम्यान, थंडीची लाट येणार असल्याचा इशारा हवामान खात्यानं दिला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com