Weather Report: उत्तर भारतात थंडीची लाट, १६ राज्यांमध्ये दाट धुक्याचा इशारा

North India Weather Report: हवामान खात्याने (IMD) हिमाचल प्रदेश, पंजाब, हरियाणा आणि राजस्थानमध्ये येत्या काही दिवसांत थंड लाटेचा इशारा जारी केला आहे.
North India
North Indiayandex
Published On

हवामान खात्याने (IMD) हिमाचल प्रदेश, पंजाब, हरियाणा आणि राजस्थानमध्ये येत्या काही दिवसांत थंड लाटेचा इशारा जारी केला आहे. या भागांतील तापमानात मोठी घसरण होऊन थंडीचा जोर अधिक तीव्र होण्याची शक्यता आहे. नागरिकांनी गरम कपड्यांचा वापर करून काळजी घेण्याचा सल्ला हवामान खात्याने दिला आहे.

पंजाब, हरियाणा, राजस्थान आणि हिमाचल प्रदेशासोबत उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, बिहार, ओडिशा, झारखंड, पश्चिम बंगाल, आसाम, मेघालय, नागालँड, मणिपूर, मिझोराम आणि त्रिपुरा या राज्यांमध्ये दाट धुक्याचा इशारा देण्यात आला आहे. या राज्यांमध्ये दृष्यमानतेवर परिणाम होण्याची शक्यता असल्यामुळे प्रवाशांनी वाहन चालवताना अधिक काळजी घेण्याचा सल्ला देण्यात आला आहे.

North India
Winter Clothes: हिवाळ्यात पाऊस आणि थंडीपासून सुरक्षित ठेवणारे 'हे' आहेत मल्टिफंक्शनल कपडे

हवामान विभागाच्या अंदाजानुसार, उत्तर भारतात थंडीचा प्रभाव वाढत असून अनेक ठिकाणी तापमानात लक्षणीय घट झाली आहे. थंड वाऱ्यांचा प्रभाव अधिक असल्याने थंड लाट जाणवण्याची शक्यता आहे. विशेषतः हिमाचल प्रदेश आणि पंजाबसारख्या राज्यांत पहाटेच्या आणि रात्रीच्या वेळी तापमान खूपच कमी होणार आहे. धुक्यामुळे विमानतळ, रेल्वे आणि रस्ते वाहतुकीवर परिणाम होण्याची शक्यता असून, वाहतूक वेळापत्रकांमध्ये बदल होऊ शकतो. नागरिकांनी प्रवासाची योजना आखताना हवामानाचा अंदाज विचारात घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

North India
Mumbai Weather: मुंबईची हवा विषारीच, राज्यातील २२ शहरे प्रदूषित, धुरक्याचे साम्राज्य

कृषी क्षेत्रावरही थंडीचा परिणाम होण्याची शक्यता आहे. विशेषतः गहू, मोहरी आणि बारमाही पिकांच्या उत्पादनावर थंडीचा प्रभाव होऊ शकतो. शेतकऱ्यांनी आपल्या पिकांचे संरक्षण करण्यासाठी योग्य उपाययोजना कराव्यात. उत्तर भारतातील नागरिकांना गरम कपडे, गरम पेय आणि हीटरचा वापर करून थंडीचा सामना करण्याचा सल्ला देण्यात आला आहे.

North India
Injection: इंजेक्शनला घाबरताय? काळजी करू नका; आता बिना सुईचं लागणार इंजेक्शन

दरम्यान, विदर्भातील नागपूर, अमरावती, अकोला, वर्धा, गोंदिया, यवतमाळ, भंडारा आणि गडचिरोली या जिल्ह्यांमध्ये आज पावसाची शक्यता नाही. मात्र, हवामान विभागाच्या अंदाजानुसार पुढील काही दिवसांत थंडी अधिक तीव्र होण्याची शक्यता आहे. या भागांत ढगाळ आकाश राहील आणि काही ठिकाणी धुक्याचीही शक्यता वर्तवण्यात आली आहे. किमान तापमान सुमारे 19 अंश सेल्सिअस इतके राहणार असल्यामुळे थंडीचा अनुभव अधिक तीव्र होईल.

North India
Success Story: यूपीएससी पॅनेलला जिंकणारा IPS, 3 इडियट्स'चा किस्सा अन् प्रेरणादायी प्रवास

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com