Donald Trump News Saam tv
देश विदेश

मोठी किंमत मोजावी लागेल, 'व्हाईट हाऊस'जवळच्या गोळीबारावर ट्रम्प संतापले, म्हणाले दहशतवादी....

White House Shooting: वॉशिंग्टन डीसीमध्ये व्हाईट हाऊसजवळ झालेल्या गोळीबारात दोन सुरक्षारक्षकांचा मृत्यू झाला असून अफगाण नागरिक रहमानउल्लाह लकनवाल याला ताब्यात घेण्यात आले आहे. हा दहशतवादी हल्ला असल्याचा दावा ट्रम्प यांनी केला.

Namdeo Kumbhar

  • व्हाईट हाऊसजवळ अफगाण नागरिक रहमानउल्लाह लकनवाल याने गोळीबार केला.

  • या गोळीबारात दोन नॅशनल गार्ड्सचा मृत्यू झाला असून लकनवाललाही गोळी लागली.

  • ट्रम्प यांनी हा दहशतवादी हल्ला असल्याचा दावा करत हल्लेखोराला मोठी किंमत मोजावी लागेल, असे कठोर वक्तव्य केले.

  • लकनवालने २०२१ मध्ये विशेष व्हिसा कार्यक्रमाद्वारे अमेरिकेतील प्रवेश केला होता.

White House Firing News : अमेरिकेत वॉशिंग्टन डीसी येथील व्हाईट हाऊसजवळ झालेल्या गोळीबाराने जगात खळबळ उडाली आहे. एका व्यक्तीने अचानक व्हाईट हाऊसच्या गार्ड्सवर गोळीबार केला. हा दहशतवादी हल्ला आहे, हल्लोखोरला मोठी किंमत मोजावी लागेल, असा गंभीर इशारा ट्रम्प यांनी दिला आहे. या घटनेची जगभरात जोरदार चर्चा सुरू आहे. अमेरिकेतली न्याय विभागाच्या अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, लकनवालने २०२१ मध्ये एका विशेष व्हिसा कार्यक्रमांतर्गत अमेरिकेत प्रवेश केला. त्याचे नागरिकत्व उघड झाल्यानंतर, सर्व अफगाण नागरिकांसाठी स्थलांतर थांबवण्यात आले आहे.

गोळीबार झाल्यानंतर दोन्ही सैनिकांना तात्काळ रूग्णालयात दाखल करण्यात आले. पण त्या दोघांचाही मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. एलॉन मस्क यांनी एक्सवर पोस्ट करत दोन सैनिकांचा मृत्यू झालाचा दावा केला आहे. अमेरिकन तपास पथकाने या हल्ल्यामागे २९ वर्षाचा रहमानउल्लाह लकनवाल असल्याचा संशय व्यक्त केला आहे. रहमानउल्लाह लकनवाल हा वॉशिंग्टनमध्ये राहणारा अफगाण नागरिक आहे. गोळाबारानंतर काही क्षणात व्हाईट हाऊसचे इतर नॅशनल गार्ड्स घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी संशयिताला ताब्यात घेतले. लकनवाललाही गोळी लागली आणि तो ताब्यात आहे.

मोठी किंमत मोजावी लागेल, ट्रम्प यांचा इशारा - Trump’s statement on Washington DC White House gun attack

या हल्ल्याच्या वेळी फ्लोरिडामध्ये असलेले अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी व्हाईट हाऊसजवळ झालेल्या गोळीबाराबद्दल गंभीर इशारा दिला. ज्याने सुरक्षारक्षकांवर गोळीबार केला त्याला खूप मोठी किंमत मोजावी लागेल, असा इशाराच ट्रम्प यांनी दिला आहे. त्याशिवाय हा दहशतवादी हल्लाच असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

रहमानउल्लाह कोण आहे? Who is Rahmanullah Laknawal involved in the White House shooting?

व्हाईट हाऊस जवळ गोळीबार करणारा रहमानउल्लाह लकनवाल हा अफगाणिस्तानमधील स्थलांतरित असल्याचे अमेरिकन मिडिया ने दावा केला आहे. लकनवालने ऑपरेशन अलायज वेलकम अंतर्गत अमेरिकेत प्रवेश केला होता. त्याला वॉशिंग्टनमधील बेलिंगहॅम येथे पुनर्वसन करण्यात आले.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, रहमानउल्लाह लकनवाल हा वॉशिंग्टन डीसीमधील फरागुट वेस्ट मेट्रो स्टेशनजवळ थांबला होता. तो पहाटे २:१५ वाजता (स्थानिक वेळेनुसार) एका व्हाईट हाऊसच्या कोपऱ्यावर पोहोचला अन् त्याने गोळीबार केला. त्याने एका गार्ड्सच्या छातीत अन् एकाच्या डोक्यात गोळी झाडली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : राजगुरुनगर नगरपरिषदेतील कामगारांचं आंदोलन!

Ticket To Finale Winner: 'या' स्पर्धकाची BB19 च्या ग्रँड फिनालेमध्ये डायरेक्ट एन्ट्री; मिळाली खास पॉवर

Protein Shake Recipe : घरच्या घरी हेल्दी चॉकलेट प्रोटीन शेक बनवण्याची सोपी रेसिपी

'आयुष्यात पोकळी..' धर्मेंद्र यांच्या निधनानंतर हेमा मालिनींची भावनिक पोस्ट, मन केले मोकळे

Crime : २ कोटींची लाच मागितल्याने निलंबन, पण PSI काही सुधारला नाही, पैसे डबल करून देतो सांगितलं अन्...

SCROLL FOR NEXT