अंबरनाथमध्ये एकनाथ शिंदेंचा भाजपला दे धक्का, पदाधिकार्‍यांनी कमळ सोडलं अन् धनुष्यबाण घेतला हातात

Ambernath Politics: अंबरनाथमध्ये भाजपला मोठा धक्का बसला असून भाजपच्या अनेक पदाधिकाऱ्यांनी भाजप सोडून शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे. भाजप महिला मोर्चा अध्यक्षा डॉ. रोझलिन फर्नाडिस यांनीही धनुष्यबाण हाती घेतला.
Local Body Election
Local Body ElectionSaam TV Marathi News
Published On
Summary
  • अंबरनाथमध्ये भाजपच्या अनेक पदाधिकाऱ्यांनी भाजप सोडून शिंदे गटाच्या शिवसेनेत पक्षप्रवेश केला.

  • भाजप महिला मोर्चा अध्यक्षा डॉ. रोझलिन फर्नाडिस यांचा मोठा पक्षप्रवेश झाल्याने भाजपला धक्का बसला.

  • भाजप आणि शिंदे शिवसेना यांच्यात फोडाफोडीचे राजकारण चांगलेच तापले.

  • या घडामोडीनंतर शिंदे गटाच्या उमेदवार मनीषा वाळेकर यांच्या संधी आणखी बळकट झाल्याचे चित्र.

अजय दुधाणे, साम टीव्ही प्रतिनिधी

Local Body Election, Shiv Sena vs BJP : स्थानिक स्वाराज्य संस्थांच्या निवडणुकीचा धुरळा उडाला असतानाच अंबरनाथमध्ये भाजपला जोरदार धक्का बसला आहे. भाजपच्या अनेक पदाधिकार्‍यांनी भाजपची साथ सोडत एकनाथ शिंदेच्या शिवसेनेत पक्षप्रवेश केला. निवडणुकीच्या तोंडावर भाजपसाठी हा मोठा धक्का मानला जातोय. शिवसेना आणि भाजपा फोडाफोडीचे राजकारणाची राज्यात चर्चा सुरू असतानाच शिंदेंच्या शिवसेनेच्या गळाला मोठा नेता लागलाय. भाजप महिला मोर्चा अध्यक्ष डॉ.रोझलिन फर्नाडिस यांनी धनुष्यबाण हाती घेतला आहे. अंबरनाथ शहरप्रमुख अरविंद वाळेकर यांच्या हस्ते पक्षप्रवेश झाला.

अंबरनाथमध्ये बुधवारी भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी केला शिंदेंच्या शिवसेनेमध्ये पक्षप्रवेश केला आहे. भाजप महिला अध्यक्ष डॉ.रोझलिन फर्नाडिस यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी अंबरनाथ शहरप्रमुख अरविंद वाळेकर यांच्या उपस्थितीत धनुष्यबाण हाती घेतला आहे. त्यामुळे भाजपला मोठा धक्का बसला आहे. तुम्ही जर आमचे कार्यकर्ते फोडले तर आम्ही जशास तसे उत्तर देऊ, अशा इशारा यावेळी शिंदे गटाचे माजी उपनगराध्यक्ष राजू वाळेकर यांनी भाजपला दिला.

Local Body Election
Gautam Gambhir : रोगापेक्षा इलाज भयंकर, टीम इंडियाची अवस्था इतकी 'गंभीर' का झाली?

अंबरनाथ नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप आणि शिंदेंच्या शिवसेना असा सामना पाहायला मिळत आहे. तर अंबरनाथमध्ये भाजप आणि शिंदे यांच्या शिवसेना पदाधिकार्‍यांचं फोडण्याचं राजकारण सुरू असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. महायुतीमध्ये वरिष्ठांनी ठरवलं आहे की कोणत्याही पक्षातील पदाधिकारी कार्यकर्ते फोडाफोडी करू नये, मात्र असं असताना देखील अंबरनाथ शहरात फोडाफोडी सुरूच आहे. काही दिवसांपूर्वी भाजपने शिंदेच्या शिवसेनेचे पदाधिकारी रूपसिंग धल यांना फोडले होते. त्यानंतर शिंदेंच्या शिवसेनेकडून त्याला प्रत्युत्तर देत शिंदेंच्या शिवसेनेने अंबरनाथ भाजप महिला मोर्चा अध्यक्ष डॉ.रोझलिन फर्नाडिस यांचा शिंदेंच्या शिवसेनेमध्ये पक्षप्रवेश झाला.

Local Body Election
Beed : बीडचे बिहार झाले! राष्ट्रवादीच्या नेत्यावर १५ जणांचा हल्ला; कार फोडली, बेदम मारहाण

भाजपमध्ये मान सन्मान न मिळाल्याने मी शिंदेंच्या शिवसेनेमध्ये पक्षप्रवेश केला असल्याचा आरोप डॉ.रोझलिन फर्नाडिस यांनी केला आहे. यावेळी शिंदे गटाचे माजी उपनगराध्यक्ष राजू वाळेकर यांनी सांगितलं की तुम्ही आमचे पदाधिकारी फोडू नका आम्ही तुमचे फोडणार नाही. मात्र जर तुम्ही असं करत असाल तर आम्ही तुमच्या तसं उत्तर देतो असा इशारा भाजपला दिला आहे. त्यामुळे शिंदेंच्या शिवसेनेमध्ये नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार मनीषा वाळेकर यांना निवडून आणण्याची ताकद वाढली आहे.

Local Body Election
बिबट्यांनंतर आता माकडांची दहशत, एका माकडाचे 600 रूपये मिळणार

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com