Maharashtra forest department : राज्यात आता बिबट्यांनंतर माकडांची दहशत पसरलीय. त्यामुळे आता वनविभागानं माकड पकडण्याची मोहीम सुरू केलीय. विशेष म्हणजे माकड पकडून देणाऱ्याला बक्षीस मिळणार आहे...नेमकी काय आहे ही मोहीम पाहूयात एक रिपोर्ट...
राज्यात बिबट्याची दहशत वाढली असतांना आता अनेक भागात माकडांनी उच्छाद मांडलाय. पुण्यात एका सोसायटीत शिरलेल्या माकडांच्या टोळीनं रहिवाशांना सळो की पळो करुन सोडलंय. आता मानव माकडांच्या या संघर्षावर नियंत्रण मिळवण्यासाठी वनविभागानं अनोखी शक्कल लढवत माकडा पकडा आणि पैसे मिळवा ही योजना सुरु केलीये. मुंबईत जसं उंदिर पकडल्यावर कंत्राटी कामगारांना पैसे दिले जायचे तसंच आता माकडं पकडल्यावर वनविभागानं आपल्या कामाचं विकेंद्रीकरण करत जनतेलाच कामाला लावलंय. नेमका शासनानं काय निर्णय घेतलाय, पाहा
माकड बचावासाठी सुरक्षितपणे 10 माकडं पकडल्यास आणि त्यांना सुरक्षित सोडल्यास प्रती माकड 600 रुपये मिळणार आहेत 10 पेक्षा जास्त माकड जर पकडले तर प्रति माकड 300 रुपये देण्यात येतील. यावेळी एकावेळी 10 हजारांपेक्षा जास्त आर्थिक सहाय्य मिळणार नसल्याचं देखिल सांगण्यात आलंय. 5 माकडं पकडण्यासाठी प्रशिक्षित व्यक्तींना प्रवास खर्च मिळणार असून 1 हजार रुपये प्रवासासाठी देण्यात येणारेयत. जास्त माकडं पकडले तरी वेगळा प्रवास खर्च मिळणार नाही. हे देखिल नमुद करण्यात आलंय.
माकडांच्या नसबंदीचा प्रस्ताव हा गेल्या दोन अडिच वर्षांपासून धूळखात पडून आहे. त्यावर हालचाली करण्याऐवजी प्रशासनानं जनतेला कामाला लावलंय. माकडं पकडतांना आता तुम्हाला त्याचं व्हिडीओ रेकॉर्डींग देखिल करावं लागणारये. त्यामुळे वनविभागाला सहकार्य करुन माकडं पकडतांना आपलं माकड हाड मोडणार नाही ना? याची काळजी घ्या आणि खुश्शाल माकडं पकडा आणि पैसे कमवा.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.