Actor Vikrant Massey pays emotional tribute to Clive Kunder, his family friend and one of the victims in the Air India plane crash that killed over 240 passengers. Saam
देश विदेश

Ahmedabad Plane Crash : विमान दुर्घटनेत अभिनेत्यानं जवळच्या व्यक्तीला गमावलं, अहमदाबाद प्लेन क्रॅशवर व्यक्त केलं दु:ख

Air India Plane Crash Death News: अभिनेता विक्रांत मैसी यानं अहमदाबाद एअर इंडिया विमान दुर्घटनेत जवळचा मित्र क्लाइव्ह कुंदर याला गमावलं आहे. विक्रांतने सोशल मीडियावर भावनिक पोस्ट करत त्यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला.

Namdeo Kumbhar

Ahmedabad Air India Plane Crash : अहमदाबाद एअर इंडिया विमान दुर्घटनेत अभिनेता विक्रांत मैसी यांच्या कुटुंबातील जवळचा मित्र क्लाइव्ह कुंदर यांचा मृत्यू झाला. विक्रांत मॅसीने सोशल मीडियावर भावनिक पोस्ट करत त्यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला.

अहमदाबादमध्ये गुरूवारी झालेल्या विमान दुर्घटनेत २०० पेक्षा जास्त प्रवाशांचा मृत्यू झाला. एअर इंडियाच्या विमान अपघातानंतर देशात खळबळ उडाली. या अपघातात १६९ भारतीयांनी जीव गमावला आहे. अहमदाबाद विमानताळारून लंडनला निघालेलं विमान अवघ्या दोन मिनिटांत ७०० फूट उंचीवरून कोसळलं अन् क्षणात होत्याचं नव्हतं झाले. या दुर्घटनेत को-पायलट क्लाइव कुंदर यांचेही निधन झाले. कुंदर हे अभिनेता विक्रमांत मैसी याचा जवळचा मित्र होता. विक्रांत मैसी यानं या दुर्घटनेवर दुख व्यक्त करत सोशल मीडियावर पोस्ट केली आहे.

अहमदाबादमध्ये घडलेल्या अकल्पनीय आणि दु:खद विमान अपघातात आपल्या प्रियजनांना गमावलेल्या कुटुंबियांबद्दल आणि मित्रमंडळींबद्दल माझे मन हळहळते आहे. माझे काका क्लिफोर्ड कुंदर (फॅमेली फ्रेंड) यांनी त्यांचा मुलगा क्लाइव्ह कुंदर याला गमावल्याचे कळल्याने मला आणखी दुख झाले. क्लाइव्ह त्या फ्लाइटमध्ये प्रथम ऑपरेशन अधिकारी म्हणून कार्यरत होते, अशी पोस्ट मैसी यानं केली आहे.

अहमदाबाद येथील सरदार वल्लभभाई पटेल आंतरराष्ट्रीय विमानतळावरून लंडनच्या गॅटविक विमानतळाकडे जाणाऱ्या एअर इंडिया फ्लाइट AI171 चा भीषण अपघात झाला. या बोईंग 787-8 ड्रीमलाइनर विमानाने उड्डाणानंतर अवघ्या काही मिनिटांतच मेहगनीनगर परिसरात कोसळून स्फोट झाला. या दुर्घटनेत विमानातील २४१ प्रवाशांचा मृत्यू झाला. या दुर्घटनेत क्लाइव्ह कुंदर यांचा देखील मृत्यू झाला. सुरुवातीला प्रसारमाध्यमांनी क्लाइव्ह कुंदर हे बॉलिवूड अभिनेता विक्रांत मैसी यांचे चुलत भाऊ असल्याचा दावा केला होता. पण विक्रांतने याबाबत स्पष्टीकरण देत ही माहिती चुकीची असल्याचे सांगितले.

“क्लाइव्ह कुंदर हे माझे चुलत भाऊ नव्हते, तर आमच्या कुटुंबाचे जवळचे मित्र होते. कृपया याबाबत कोणतेही अंदाज बांधू नका आणि कुटुंबियांना शांततेत शोक करू द्या.”
विक्रांत मैसी, अभिनेता

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Amdar Niwas Canteen : मोठी बातमी! आमदार निवासातील कॅन्टीनचा परवाना रद्द; अन्न व औषध प्रशासन विभागाकडून कारवाई

Dancing Car : आता काय म्हणावं? दोघांचा ताबा सुटला, दिवसाढवळ्या कारमध्येच जोडप्याचा रोमान्स, एकमेकांचे कपडे काढले अन्..., व्हिडिओ व्हायरल

गुंठाभर जमिनीचा ७/१२ सहज मिळणार, तुकडाबंदी कायदा रद्द करणार; सरकारची विधानसभेत घोषणा

पर्यटनासाठी लागणार तिकीट, धबधब्यावर जायचंय तर खटाखट पैसे मोजा; प्रशासनाचा निर्णय काय?

Ladki Bahin Yojana : नव्या लाडकींना लाभ मिळणार का? पोर्टल कधी सुरू होणार? वाचा स्पेशल रिपोर्ट

SCROLL FOR NEXT