सर्वांचंच लक्ष लागून असलेल्या ४ राज्यांच्या विधानसभा निवडणुकीचे निकाल आज जाहीर होत आहे. आतापर्यंतच्या कलानुसार ३ राज्यांमध्ये भाजपला स्पष्ट बहुमत मिळताना दिसून येत आहे. तर काँग्रेसने केवळ एका राज्यात बहुमताकडे वाटचाल केली आहे.
लोकसभेची निवडणूक तोंडावर असताना काँग्रेसला बसलेला हा मोठा धक्का मानला जात आहे. राजस्थानात सत्ता राखण्यास काँग्रेसला अपयश आल्याचं दिसून येतंय. याशिवाय छत्तीगड आणि मध्य प्रदेशसारखी मोठी राज्य देखील काँग्रेसच्या हातातून जात आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
तेलंगणात मात्र काँग्रेसला विजयाची चव चाखता येणार आहे. कारण, बीआरएसला पिछाडीवर सोडत काँग्रेसने मोठी आघाडी घेतली आहे. दरम्यान, 3 राज्यांमध्ये काँग्रेस पक्ष पराभवाच्या छायेत का आहे? याची अनेक कारणं राजकीय अभ्यासकांनी सांगितली आहे. (Rajasthan Assembly Election 2023 Results LIVE)
ग्रामीण भागात काँग्रेस पक्ष खूपच पिछाडीवर पडताना दिसून आला. एक काळ असा होता, की काँग्रेसच्या विविध संघटना पक्षासाठी खूप काम करत असत. त्यामुळे पक्षाची धोरणे आणि विचार सर्वसामान्यांपर्यंत पोहोचणे सोपे जात होते. मात्र काही काळापासून या सर्व संघटना सुस्त असल्याचं दिसून आलं. याचा फटका विधानसभा निवडणुकीत बसला. (Telangana Assembly Election Results 2023)
काँग्रेसच्या पराभवाचे सर्वात मोठे कारण म्हणजे नेतृत्वावरील विश्वासाचा अभाव. विधानभा निवडणुकांमध्ये काँग्रेसचे नेतृत्व कमकुवत दिसले.
मध्य प्रदेश आणि राजस्थानमध्ये काँग्रेसमध्ये मोठी गटबाजी दिसून आली. अशोक गेहलोत आणि सचिन पायलट यांच्या गटातील संघर्षाचा काँग्रेसला मोठा फटका बसला.
मध्य प्रदेशमध्ये ज्योतिरादित्य शिंदे यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर अनेक छोटे नेतेही भाजपमध्ये दाखल झाले. तेव्हा काँग्रेसला मोठं खिंडार पडलं. याचा फटका निवडणुकीत बसला.
प्रियांका गांधी आणि राहुल गांधी यांनी प्रचार करत मतदारांना अनेक आश्वासने दिली. पण मतदारांना त्यांच्या आश्वासनांवर विश्वास बसला नाही.
काँग्रेस नेत्यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लक्ष्य करण्याचा प्रयत्न केला. मल्लिकार्जुन खरगे यांनी पंतप्रधान मोदींबाबत आक्षेपार्ह विधान केलं. याचाही फटका काँग्रेसला बसल्याचं बोललं जातंय.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.