Telangana Election Results 2023: बीआरएसच्या पराभवाचं महाराष्ट्र कनेक्शन; के. चंद्रशेखर राव यांना कुठे फटका बसला?

Telanagana Election Result 2023: काँग्रेसने तेलंगणा विधानसभा निवडणुकीत जोरदार मुसंडी मारली आहे. त्यांनी बीआरएसला मोठ्या फरकाने मागे टाकलं आहे.
Telangana Assembly Election Result 2023 10 major Reasons for Defeat of K Chandrasekhar Rao BRS Party
Telangana Assembly Election Result 2023 10 major Reasons for Defeat of K Chandrasekhar Rao BRS PartySaam TV
Published On

Telanagana Election Result 2023 Live Updates:

संपूर्ण देशाचं लक्ष लागून असलेल्या ४ राज्यांच्या निवडणुकांच्या निकालाचे प्राथामिक कल हाती येत आहे. राजस्थान, मध्यप्रदेशात काँग्रेस आणि भाजपमध्ये चांगलीच चुरस रंगली आहे. तर छत्तीसगड आणि तेलंगणात काँग्रेसला बहुमत मिळताना दिसून येत आहे.

विशेष बाब म्हणजे काँग्रेसने तेलंगणा विधानसभा निवडणुकीत जोरदार मुसंडी मारली आहे. त्यांनी बीआरएसला मोठ्या फरकाने मागे टाकलं आहे. तेलंगणात सध्या काँग्रेस ७० जागांवर आघाडीवर आहे. तर बीआरएस केवळ ३४ जागांवर आघाडीवर आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Telangana Assembly Election Result 2023 10 major Reasons for Defeat of K Chandrasekhar Rao BRS Party
Rajasthan Election Result 2023: राजस्थानमध्ये 30 वर्षांचा इतिहास बदलणार? भाजप-काँग्रेसमध्ये चुरशीची लढत, कोण आघाडीवर?

काँग्रेसच्या मुसंडीमुळे के. चंद्रशेखर राव यांना मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. २०१८ मध्ये तेलंगणात बीआरएसने सत्ता स्थापन केली होती. त्यानंतर चंद्रशेखर राव यांनी दुसऱ्या राज्यांकडे आपला मोर्चा वळवला. तेलंगणासोबत ते महाराष्ट्रही जिंकायला निघाले होते. पण आता त्यांच्यावर तेलंगणाच गमावण्याची वेळ आली आहे.  (Telangana Assembly Election Results 2023)

के. चंद्रशेखर राव यांचं कुठं चुकलं?

  • विधानसभा निवडणुका तोंडावर असतानाही चंद्रशेखर राव यांनी तेलंगणात फारस लक्ष दिलं नसल्याचं बोललं जातंय.

  • गेल्या ६ महिन्यांपासून तर त्यांचे महाराष्ट्रातील दौरे अधिकच वाढले होते. त्यामुळे स्थानिक प्रश्नांवर त्यांना लक्ष देता आलं नाही.

  • चंद्रशेखर राव यांनी महाराष्ट्रातील वृत्तपत्रात तेलंगणाच्या कामाच्या जाहिराती दिल्या. सभा घेतल्या. त्यात वेळ गेला आणि तेलंगणाकडे दुर्लक्ष झालं.

  • चंद्रशेखर राव यांनी जाहिरातीतून अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीसाठी भरपूर कामे केल्याचं दाखवलं. पण प्रत्यक्षात ग्राऊंड लेव्हलला रिअॅलिटी वेगळी होती.

  • के चंद्रशेखर राव यांनी पक्षाचं नाव बदलून बीआरएस ठेवलं. त्यामुळे समर्थकांमध्ये नाराजी पसरली.

  • तेलंगणातील शेतकऱ्यांना पिण्याच्या पाण्यापासून वीज ते शेतीच्या प्रश्नांपर्यंत अनेक समस्या होत्या. त्याकडे दुर्लक्ष झाल्याने मतदारांनी त्याचा राग ईव्हीएममधून व्यक्त केला असावा.

  • विशेष म्हणजे चंद्रशेखर राव आणि त्यांचे मंत्री महाराष्ट्रात वारंवार जात असल्याने नागरिकांमध्ये रोष होता, असं जाणकारांचं म्हणणं आहे.

  • चंद्रशेखर राव यांचं तेलगणात दुर्लक्ष होताच काँग्रेसने संधी साधली. त्यांनी ग्राऊंड लेव्हलवर काम केले. त्यामुळे बीआरएस विरोधातील रोषाला आणखी खतपाणी मिळालं. त्यांचा हा रोष काँग्रेसने हेरला आणि ग्राऊंड लेव्हलवर काम करण्यास

  • तेलंगणात काँग्रेसची हवा निर्माण होतेय, ही गोष्टी हेरण्यात मुख्यमंत्री चंद्रशेखर राव कमी पडले. परिणामी निवडणुकीत बीआरएसला मोठा फटका बसला.

Telangana Assembly Election Result 2023 10 major Reasons for Defeat of K Chandrasekhar Rao BRS Party
BJP vs Congress: भाजपचा मास्टर प्लान तयार, ४ राज्यांच्या निकालाआधीच नवी रणनिती; काँग्रेसचं टेन्शन वाढणार?

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com