Police investigation underway after shocking rape and murder of a nursing student in Varanasi saam tv
देश विदेश

नर्सिंगमध्ये शिकणाऱ्या 20 वर्षाच्या विद्यार्थिनीची बलात्कारानंतर हत्या; गुप्तांगातून रक्तस्त्राव अन् पोस्टमार्टम रिपोर्टने खळबळ

Varanasi Nursing Student Physical Assault And Killed Full Case Details: वाराणसीतील २० वर्षीय नर्सिंग विद्यार्थिनीच्या खून प्रकरणात धक्कादायक खुलासा झाला आहे. पोस्टमार्टम अहवालात बलात्काराची पुष्टी झाली आहे.

Omkar Sonawane

वाराणसीमध्ये एका 20 वर्षीय विद्यार्थिनीच्या खून प्रकरणात आज धक्कादायक खुलासा झाला आहे. युवतीचा मृतदेह मुलांच्या वस्तीगृहाच्या जिन्यावर आढळून आला होता. सुरुवातीला पोलिसांनी हा तपास केवळ खून प्रकरण म्हणून सुरू केला होता. मात्र पोस्टमार्टम अहवालात अत्यंत क्रूर पद्धतीने बलात्कार झाल्याचे सामोर आले आहे. पोस्टमार्टम अहवालानंतर पोलिसांनी कुटुंबियांच्या तक्रारींच्या आधारे खूनासोबत बलात्कार आणि पुरावे नष्ट करण्याच्या कलमांचीही भर घातली. पोलिसांनी आरोपी मोहम्मद समीर याला ताब्यात घेऊन पुढील कायदेशीर कारवाई सुरू केली आहे.

नर्सिंग विद्यार्थिनीच्या मृत्यू प्रकरणात सुरुवातीलाच बलात्कार करून खून केल्याचा अंदाज व्यक्त केला जात होता. मात्र संवेदनशील प्रकरण असल्याने पोलीस पोस्टमार्टम रिपोर्टची वाट पाहत होते. दोन डॉक्टरांच्या पॅनलकडून गुरुवारी प्राप्त झाला. डीसीपी (वरुणा झोन) लिपी नागयाच यांनी सांगितले की, पोस्टमार्टम अहवालानुसार २० वर्षीय युवतीच्या गुप्तांगातून मोठ्या प्रमाणात अंतर्गत रक्तस्राव झाला होता. हा रक्तस्राव ‘हॅमोरॅजिक शॉक’मुळे झाल्याचे स्पष्ट झाले. या शॉकमुळे गुप्तांगाच्या आतील भिंतींना गंभीर इजा झाली आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणात रक्तस्राव होऊन युवतीचा मृत्यू झाला.

लिपी नागयाच यांनी सांगितले की, मृतदेह सापडल्यानंतर पोलिसांनी खुनाच्या कलमांखाली गुन्हा दाखल केला होता. मोबाईल कॉल डिटेलच्या आधारे मोहम्मद समीर याला ताब्यात घेण्यात आले होते. पोस्टमार्टम अहवालातील नव्या निष्कर्षांनुसार आता बलात्कार आणि पुरावे नष्ट करण्याच्या कलमांची भर घालण्यात आली आहे. कारण आरोपीने युवतीचा मोबाईल लपवला होता. कुटुंबीयांनीही समीरच्या विरोधात लिखित तक्रार दिली आहे. तपासादरम्यान युवतीच्या गर्भधारणा आणि गर्भपाताबाबतच्या बातम्या खोट्या असल्याचेही स्पष्ट करण्यात आले.

नेमके प्रकरण काय?

बुधवारी सकाळी नर्सिंगच्या २० वर्षीय विद्यार्थिनीचा मृतदेह सारनाथ परिसरातील एका बॉयज हॉस्टेलच्या जिन्यावर आढळला. तिच्या गुप्तांगातून मोठ्या प्रमाणात रक्तस्राव होत होता. तिच्या बॅगमध्ये काही औषधे आणि क्रीमही सापडली. मात्र तिचा मोबाईल गायब होता. मोबाईलच्या कॉल डिटेलच्या आधारे तिच्याच कॉलेजमध्ये शिकणाऱ्या मोहम्मद समीर याला पोलिसांनी ताब्यात घेतले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

CJP ला झटका; शिवाजी पार्कवरच्या आंदोलनाला मुंबई पोलिसांनी परवानगी नाकारली

IND vs WI 1st ODI: विराट कोहलीची शतकीय खेळी; ८ गडी राखून भारताचा वेस्ट इंडिजवर शानदार विजय

किंग कोहलीने इतिहास रचला; ‘विराट’ षटकारासह ‘रन मशिनचे ५५ वे शतक, सचिन तेंडुलकरचे दोन मोठे विक्रम

Maharashtra News Live Update: भामरागडमधून दिलासादायक बातमी; पुराचे पाणी हळूहळू ओसरू लागले

साधेपणाने लग्न केलेल्यांना मुलं झाली नाहीत का? दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर विखेंचं अजब विधान

SCROLL FOR NEXT